सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने क्षणात नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. यामध्ये एक आजी वेस्टर्न स्टाईमध्ये जेवण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रंचड व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून हसून पोट दुखून येते. तर काही व्हिडिओ इतके भयावह असतात की अंगवार काटा येईल. शिवाय काही असेही व्हिडिओ पाहायला मिळतात जे क्षणात लोकांचे मन जिंकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक आजी(Grandma) वेस्टर्न स्टाईलमध्ये अगदी आरामात जेवणे करताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेजण आश्चर्यचकित झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजी(Grandma) एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायाला गेल्या आहेत. आजी चमच्या आणि काट्याने म्हणजेच Fork – Spoon ने जेवण करताना दिसत आहे. असे वाटतं आहे की, त्यांना अनेकवर्षांपासून याची सवय आहे. तसे तर आपल्या भारतीय संस्कृतीत हाताने जेवण करण्याची पद्धत आहे. असे म्हणतात की हाताने जेवणे करणे केवळ संस्कृतीचाच भाग नसून आरोग्यासाठी देखील उत्तम असते.
पण तुम्ही जसा देश तसा भेष ही म्हण नक्कीच ऐकली असेल. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही ज्या ठिकाणी असाल, ज्या समाजात राहत असाल तेथील लोकांप्रमाणे तुमचे आचरण असावे. व्हिडिओतील दृश्यावरुन तुम्हाला लक्षात येत असेल की, आजी एका वेस्टर्न रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेल्या आहेत. यामुळे वेस्टर्न पद्धतीने फोर्क आणि स्पूनने त्यांनी जेवणे केले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांच्या मन जिंकत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @theaxedrop या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर आजीचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने आजीचा नाद नाही करायचा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने मला पण एवढं परफेक्ट येत नाही असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने आजी रॉक्स, लोक शॉक्स असे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये क्लासी अँड सॅसी ग्रँडमा’ असे लिहिले आहे.
हेही वाचा :
कामाच्या तासांत होणार वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
मोदी सरकारचं GST गिफ्ट दैनंदिन वस्तू स्वस्त…..
AIIMS मध्ये भरती! असिस्टंट प्रोफेसर बनू इच्छिता?