पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरूणांना सरकारने खुशखबर दिली आहे.(decisions) राज्यात तब्बल १५ हजार पोलिसांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांची आता प्रतिक्षा आता संपली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये पोलीस दलात भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही भरती प्रक्रिया वेगाने सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे. दोन महिन्यात राज्यात पोलीस भरती होण्याची शक्यता आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाहीत. एकनाथ शिंदे सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दौरा आटोपल्यानंतरही शिंदे राज्यात परतणार होते, पण ते तिथेच मुक्कामी राहिले. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित राहिल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहे.(decisions) रायगड आणि नाशिकच्या पालमंत्रिपदावरून शिवसेना नाराज आहे, त्यामुळे शिंदेही नाराज असल्याचे म्हटले जातेय. काहींच्या मते एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली.
मंत्रिमंडळातील ४ महत्त्वाचे निर्णय –
गृह विभाग – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी
अन्न, नागरी पुरवठा विभाग – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
विमानचालन विभाग – सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत गोगावलेही आजच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.(decisions) रायगड जिल्ह्यात १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना दिले, आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना दिले जाईल, अशी चर्चा सुरू झाल्यामुळे गोगावले नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्ली गाठली बोललं जातेय. गोगावले यांनी नाराजीचे वृत्त फेटाळले आहे.
हेही वाचा :
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बेस्ट वीज विभागाचा सर्वात मोठा निर्णय
एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
डे-केअरमध्ये 15 महिन्याच्या मुलीचा गळा दाबणे, तोंडात पेन्सिल घालणे, शरीरावर चावा घेण्याचा घडला भयंकर प्रकार