पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणानंतर आता पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत भाजपच्या(political circles) एका पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि सहकारनगर पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. तळजाई परिसरातील एका रिकाम्या कारखान्यात रमी खेळत असताना भाजप पदाधिकारी औदुंबर विठ्ठल कांबळे आणि त्याच्या दोन ते तीन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी तळजाई भागात छापा टाकण्यात आला. यावेळी पर्वती विधानसभा मतदारसंघाचे चिटणीस असलेले औदुंबर कांबळे आपल्या सहकाऱ्यांसोबत रमी खेळत असल्याचे आढळले. डाव रंगात आला असतानाच पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून जुगार साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

औदुंबर कांबळे हा भाजपचा (political circles)सक्रिय कार्यकर्ता असून पर्वती विधानसभा मतदारसंघात तो चिटणीस पदावर कार्यरत आहे. त्याच्या अटकेनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. घटनेबाबत भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, हा प्रकार पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या कारवाईनंतर सहकारनगर पोलिस ठाण्यात औदुंबर कांबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ आणि स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली आहे. जुगारासाठी वापरलेले ठिकाण, इतर सहभागींची नावे आणि या अड्ड्याचे संभाव्य जाळे उघड करण्यावर भर दिला जात आहे.

हेही वाचा :

नवीन आयकर विधेयकात काय काय बदललं? ७ नियमांमध्ये झाला मोठा बदल

अंगात 4 भुतं, 11 वेळा संभोग कर, अन्यथा नवरा मरेल अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

उद्यापासून सुरू होतोय फ्लिपकार्टचा Independence Day Sale; खरेदीवर मिळणार 50% पर्यंत बंपर डिस्काउंट

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *