‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री करणारी आणि अलीकडेच ‘हीरामंडी’ मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी कारण तिचा एखादा प्रोजेक्ट नसून, सोशल मीडियावरून तिने ब्रँड्सना दिलेला थेट इशारा आहे.सोनाक्षीने इन्स्टाग्राम स्टोरीवर संताप व्यक्त करत सांगितले की, अनेक ऑनलाइन ब्रँड्स तिचे फोटो(photo) विनापरवानगी त्यांच्या वेबसाईटवर वापरत आहेत. “एखाद्या आर्टिस्टने कपडे किंवा दागिने घातले तर ब्रँडला क्रेडिट देणे अपेक्षित असते. पण माझे फोटो थेट वेबसाईटवर वापरणे? हे नैतिकतेच्या कितपत जवळ आहे?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.

याचबरोबर सोनाक्षीने ब्रँड्सना स्पष्ट शब्दांत इशारा दिला –
“आता लगेच माझे फोटो(photo) हटवा, नाहीतर मी तुम्हाला पब्लिकली कॉल-आऊट करेन. नाहीतर मला इनव्हॉइस पाठवण्यासाठी पत्ता द्या,” असं म्हणत तिने चार हसरे इमोजी टाकले.सोनाक्षीच्या या पोस्टवर अभिनेत्री तब्बूने प्रतिक्रिया देत लिहिले – “सेम विचार, थँक्यू सोनाक्षी.” त्यावर सोनाक्षी म्हणाली, “मला माहीत होतं मी एकटी नाही.”

सोनाक्षीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांनी तिच्या या बिनधास्त भूमिकेचं समर्थन केलं आहे. कलाकारांचे फोटो परवानगीशिवाय वापरण्याबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
हेही वाचा :
महिलेला जबरदस्ती बाथरूममध्ये नेले,मारहाणही केली… बलात्कारी अभिनेत्याला अटक
वेस्टर्न स्टाईलमध्ये Fork-Spoon ने आजीने केले जेवण; VIDEO व्हायरल
कामाच्या तासांत होणार वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय