बाळू मामा दर्शनात सर्व भाविकांना समान लेखण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन होणार असल्याने रांगेतून बाळूमामांचे दर्शन(Darshan) घेणाऱ्या भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यभरातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवालय समितीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बाळूमामाच्या समाधीचे पावित्र्य जपण्यासाठी गाभारा आणि त्यासमोरील विशेष दर्शन व्यवस्था आता बंद करण्यात आली आहे.

बाळू मामा दर्शनात सर्व भाविकांना समान लेखण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन होणार असल्याने रांगेतून बाळूमामांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. यापुढे सर्व भाविकांना रांगेतून थेट दर्शन, मुखदर्शन आणि पायरी दर्शन या तीन पर्यायांमधूनच दर्शन घ्यावे लागेल. दर्शन मंडपातून सुरू होणाऱ्या रांगेतून भाविकांना बाळूमामांच्या समाधीचे व चांदीच्या पादुकांचे दर्शन घेता येईल. मंदिराच्या पूर्व बाजूने मुखदर्शन व पायरी दर्शनाची सोय केली असून, दोन्ही बाजूंना भंडारा लावण्याची व श्रीफळ, प्रसाद अर्पण करण्याची व्यवस्था आहे.
दरम्यान, सर्वच भाविकांना सुलभ आणि कमी वेळेत दर्शन(Darshan) घेता यावे, यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा संकल्प असल्याची माहिती देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष शामराव होडगे व सचिव रावसाहेब कोणकेरी व सदस्यांनी दिली.

श्रीक्षेत्र आदमापूर बाळूमामा यांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत असून, रोज रांगा लागत आहेत. सर्व भाविकांना दर्शन सुलभपणे घेता यावे यासाठी दर्शन रांगासाठी उपाययोजना आखण्यात येत आहेत. व्हीआयपी दर्शन बंद निर्णय घेतला असला तरी अपवाद वगळता मंत्री, खासदार, जिल्हाधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांना देवस्थान समितीने त्या-त्या प्रसंगानुसार दर्शन दिले जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आदमापूर ग्रामस्थांना सकाळी सात ते दहापर्यंत विना रांग समोरून दर्शन दिले जाणार आहे.
आदमापूर परिसरात काही ठिकाणी हॉटेल, दुकानासमोर बाळूमामांचे पुतळे ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे श्री मामांच्या प्रतिमेला बाधा पोहचू शकते. श्री बाळूमामांच्या प्रतिमेचे पावित्र राखले जावे. त्यासाठी असे पुतळे ठेवण्यास देवस्थान समितीने बंदी घालण्याचा निर्णय ही घेतला आहे.
हेही वाचा :
महिलेला जबरदस्ती बाथरूममध्ये नेले,मारहाणही केली… बलात्कारी अभिनेत्याला अटक
वेस्टर्न स्टाईलमध्ये Fork-Spoon ने आजीने केले जेवण; VIDEO व्हायरल
कामाच्या तासांत होणार वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय