टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री(actress) नारायणी शास्त्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये तिला पाहून चाहते अक्षरशः थक्क झाले आहेत. कारण या व्हिडीओमध्ये नारायणी भिकारीच्या रूपात दिसत आहे. तिचा हा लूक इतका वेगळा आहे की अनेकांना सुरुवातीला तिला ओळखताही आले नाही.

हा व्हिडीओ नारायणी शास्त्रीने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सिरियस नोटवर सांगायचं झालं तर मी माझं प्रोफेशन कधीच बदलू शकत नाही. मला माझ्या कामाबद्दल ही गोष्ट खूप आवडते की मी काहीही बनू शकते’ असं तिने म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये नारायणी रस्त्यावर बसलेली दिसत आहे. तिच्या हातात डफली आहे आणि ती आनंदात डफली वाजवत आहे. तिने जुने व फाटके कपडे घातले आहेत. केस वाढलेले आहेत तसेच दाढी-मिशादेखील लावल्या आहेत. डोळ्यावर काळा चष्मा असल्यामुळे तिचा हा लूक आणखी वेगळा दिसतो आहे. ती ‘दिलबर तुझे मिलने को’ हे गाणं गाताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत आहे.
नारायणीच्या या कॅप्शनवरून स्पष्ट होते की तिचा हा लूक तिच्या एखाद्या आगामी प्रोजेक्टसाठी केलेला आहे. मात्र, तिच्या चाहत्यांना हा लूक पाहून एक क्षणासाठी धक्का बसला आणि सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली.

नारायणी शास्त्रीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिची कारकीर्द ‘कहानी सात फेरों की’ या मालिकेतून झाली. त्यानंतर तिने ‘बाबुल की दुआएं लेती जा’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘संजीवनी’, ‘कुसूम’, ‘पिया का घर’, ‘आहट’, ‘ममता’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘जरा नचके दिखा’, ‘नमक हराम’, ‘लाल बनारसी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘Noyontara’ या शोमध्ये दिसत असून तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे(actress).
हेही वाचा :
इचलकरंजीमध्ये जेवणात आढळल्या अळ्या, कर्मचाऱ्यांमध्ये संताप
लाडक्या बहिणींना बाप्पा कधी पावणार ? ऑगस्टच्या पैशांसाठी किती करावी लागणारा प्रतिक्षा ?
WhatsApp वर मोठा धोका…तात्काळ अपडेट करा अन्यथा…