रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओज (Video)नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज नेहमीच थरारकतेने भरलेले असते. चालू रस्त्यावर आपण केलेला एक निष्काळजीपणा आपल्या जीवावर बेतू शकतो ज्यामुळे वाहन चालवताना रस्ते नियमांचे पालन होणे फार गरजेचे आहे. नुकताच अपघाताचा असाच एक थरार सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात बाईकसहच बाईकस्वार देखील हवेत उडून जमिनीवर आपटल्याचे दृश्य दिसून आले. हा अपघात फारच भीषण होता पण यात सुदैवाने व्यक्तीला काहीही झालं नाही आणि यात त्याचा जीव बचावला गेला. चला काय घडलं ते जाणून घेऊया.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Video)आपण पाहू शकता यात दिसते की, रस्त्यावर अनेक बाईक धावत आहेत आणि याच वेळी एक बाईक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बॅरियरला आदळून काही क्षणासाठी हवेत उडते, बाईकसह बाईकवर बसलेली मुलगी देखील यावेळी हवेत झेपावली जाते आणि जोरात जमिनीवर जाऊन आदळते. हे सर्व पाहून मागून येणारे बाईकस्वार देखील आपली बाईक थांबवून मुलीची विचारपूस करतात. मुख्य म्हणजे, या अपघातातून मुलगी सुखरूप बाहेर पडतो जमिनीवर आदळताच मागून कोणत्या गाडीने तिला चिरडू नये या विचाराने ती लगेचच उठून रस्त्याच्या कडेला उभा राहतो. यावेळी तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि अस्वस्थतता आपल्याला स्पष्ट दिसून येते. दरम्यान अपघाताचे हे दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून लोक याला शेअर देखील करत आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ @thesmartlocalmy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सर्व माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ज्याने तो रस्ता डिझाइन केला आहे, त्याला ही डिजाईन सुचलेच कशी?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या बॅरियरचा उद्देश काय होता? तो खूप धोकादायक आहे.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, तिच्यात जगण्याची प्रवृत्ती खूप जास्त आहे! तिला माहित होते की तिला मुख्य रस्त्यापासून दूर जावे लागेल”.

हेही वाचा :

पाण्याच्या बाटलीचं झाकण फक्त रंग नाही, आरोग्याचं गुपित सांगतं!

हवामान विभागाकडून मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची…

कर्जापासून सुटका मिळविण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *