भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी राज्यासह काही शेजारील भागांना मुसळधार पावसाचा(rain)इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र, कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण व उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मराठवाड्यातील काही भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस(rain) होण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.दरम्यान, राज्यातील अनेक धरणांचा पाणीस्तर झपाट्याने वाढत असून गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण भरल्याने नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यांना पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पुरेसा पुरवठा होणार आहे.

धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने गिरणा धरणाचा एक दरवाजा २० सेंटीमीटरने उघडण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या गिरणा व मन्याड धरणातून मिळून १,२३१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग कधीही वाढू शकतो, त्यामुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

मराठा आरक्षणावर प्रश्नचिन्ह! 58 लाख नोंदींचा डाटा सरकारकडे नाही

मराठ्यांचं टेन्शन वाढलं! ‘हा सरसकट जीआर नाही

रस्त्यावर भीक मागतोय हा प्रसिद्ध कलाकार….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *