देशाच्या उपराष्ट्रपतीपदी सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे(political leader) राज्यपाल होते. सी.पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याने त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यानंतर महाराष्ट्राचा राज्यपाल कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत हे कार्यभार पाहणार आहेत. आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
हेही वाचा :
एका कुटुंबाची शोकांतिका! ना खंत, ना खेद कुणाला..!
सरकारचं टेन्शन वाढलं! ओबीसींचा महामोर्चा ‘या’ तारखेला मुंबईत धडकणार
बायको माहेरी गेली म्हणून तिला आणायला गेला; मात्र घडलं भयंकर…