आशिया कपमध्ये टीम इंडियाचा (sports news)धडाखेबाज फलंदाज रिंकू सिंह मैदानात दिसणार आहे. पण त्याच्या बॅटिंगच्या आधीच तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या त्याचा एक पॉडकास्ट जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्यात रिंकूने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मजेदार खुलासा केला आहे.

रिंकूने सांगितले की, “मी कधी भारताबाहेर गेलेलो नव्हतो. विदेशात लोक कसे राहतात, काय खातात हे पाहणे हे माझे स्वप्न होते. 2019 मध्ये नीतीश राणा भाऊचे लग्न झाले आणि त्यांनी मला हनिमूनसाठी युरोपला सोबत घेतले. राहुल तेवतिया आणि मी त्यांच्यासोबत गेलो होतो.” त्याने पुढे सांगितले की, “राणा भाऊला हवे होते की मी परदेशात लोकांशी संवाद साधावा, रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर द्यावी. पण इंग्लिश बोलताना माझे वाक्यच जमत नव्हते. एका शॉपवर मी फक्त इशारा करून ऑर्डर दिली.”
रिंकूने(sports news) प्रामाणिकपणे मान्य केले की इंग्रजी नीट न येण्यामुळे त्याला खूपदा अडचणींचा सामना करावा लागतो. तो म्हणाला, “आयपीएलमध्ये अँड्रे रसेलशी थोडंफार बोलतो, पण एकूणच इंग्रजीसाठी योग्य मोहोल लागतो. न्यूयॉर्कला मी कुलदीप यादवसोबत गेलो होतो, तेव्हा सगळं ऑर्डरिंग त्यानेच केलं. त्याने मला विचारलं की ‘इंग्लिश कधी शिकणार?’ तेव्हा मला जाणवलं की हे शिकायलाच हवं. पण मी क्लासेस सुरू केले तरी जमलं नाही, डोकंच खराब झालं.”
भले इंग्रजी अजून नीट आत्मसात झाले नसले तरी रिंकूचा बॅटिंग फॉर्म जबरदस्त आहे. टी20 फॉरमॅटमध्ये त्याने आपली ओळख दमदार फिनिशर म्हणून तयार केली आहे. एशिया कपमध्ये संधी मिळाल्यास रिंकू पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवू शकतो.
हेही वाचा :
‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली
चॅम्पियन खेळाडूची प्रेयसीने केली निर्घृण हत्या, क्रीडा जगताला धक्का
कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक