AI चॅटबोट ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन त्यांच्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. सॅम ऑल्टमॅन AI बाबत सतत काही ना काही विधान करत असतात. अनेकदा त्यांनी केलेल्या विधानांमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण होते. AI जितका फायद्याचा आहे, तितकाच तो धोकादायक देखील आहे, असं सॅम ऑल्टमॅन नेहमीच सांगत असतो. त्याच्या अशाच वक्तव्यांमुळे जगभरात चिंता निर्माण होते. आता पुन्हा सॅम ऑल्टमॅन यांनी केलेले विधान चर्चेत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सॅम ऑल्टमॅन यांचे हे विधान देखील AI संबंधितच आहे.

सॅम ऑल्टमॅन यांनी पुन्हा एकदा संपूर्ण जगाच लक्ष वेधलं आहे. सॅम ऑल्टमॅन यांनी सांगितलं आहे की, ChatGPT सारख्या AI मॉडेलचा दुरुपयोग कोरोनासारख्या एखाद्या महामाराची निर्मिती करण्यासाठी केला जाऊ शकतो. असं सांगितलं जात आहे की, बायोलॉजीमध्ये हे मॉडेल्स खूप फायद्याचे ठरत आहे आणि त्यांच्या मदतीने कोणीही महामारी निर्माण करू शकतो. याबद्दल त्यांनी आणखी काय म्हटले आहे, जाणून घेऊया.
AI मॉडेल कोरोनासारखी महामारी तयार करू शकतात – ऑल्टमॅन
एका शो दरम्यान सॅम ऑल्टमॅनला असं विचारण्यात आलं होतं की, आर्टिफिशियल इंटेलीजेंसमध्ये अशी कोणती कमतरता आहे, ज्यामुळे ते चिंतेत आहेत. या प्रश्नाचं उत्तर देताना सॅम ऑल्टमॅन म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलीजेंसच्या मदतीने कोरोनासारखी महामारी तयार केली जाऊ शकते. मला याच गोष्टीची चिंता वाटते. याबद्दल सतत चिंता व्यक्त केली जात असल्याने, हा धोका कसा टाळायचा याचाही विचार करणं तितकाच आवश्यक आहे.
2020 मध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या साथीने जगात भिषण परिस्थिती निर्माण झाली होती. या महामारीत लाखो लोकांचा मृत्यू झाला. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास जग थांबेल, लोकांचे हाल होतील. त्यामुळे अशी परिस्थितीत निर्माण होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसेच जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय केलं जाऊ शकतं, त्यावरील उपाय काय असू शकतात, ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोणती पाऊलं उचलणं गरजेचं आहे, या सर्वाबाबत विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
तज्ञांनी आधीच असे इशारे दिले आहेत
केवळ सॅम ऑल्टमॅनच नाही तर यापूर्वी अनेक तज्ज्ञांनी याबाबत इशारा जारी केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, AI टूल्स जेनेटिक इंजीनियरिंग प्रोसेसची नक्कल करून किंवा नवीन प्रोटीन स्ट्रक्चर तयार करून बायोलॉजिकल रिसर्चला गती देऊ शकतात. याच्या मदतीने नवीन औषध तयार करणं आणि मेडिकल क्षेत्रात नवीन अविष्कार करण्यासाठी मदत होणार आहे. मात्र याचा दुरुपयोग केला गेला तर भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. अलिकडेच, डीपमाइंडच्या सीईओंनीही आशा व्यक्त केली आहे की AI च्या आगमनाने नवीन औषधे बनवण्याचे काम अधिक वेगवान पद्धतीने केले जाईल. ते म्हणाले की, जे संशोधन पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागत होता, तेच संशोधन आता AI च्या मदतीने काही महिन्यांत पूर्ण होणार आहे.
हेही वाचा :
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज!
7040mAh बॅटरीसह लाँच झाला Motorola चा नवा टॅब्लेट
मैत्रीणीसाठी रागाच्या भरात कंपनी कर्मचाऱ्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद