राजकोट : गुजरातमधील राजकोटमध्ये आई(Mother)-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वंशाचा दिवा हवा असल्याच्या कारणावरून एका आईने स्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलीची हत्या केली. स्वयंपाकघरातील पाण्याच्या टाकीत बुडवून तिनं चिमुकलीचा जीव घेतल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं आहे.

या प्रकरणात आरोपी महिलेचं(Mother) नाव मुस्कान कयानी असून, तक्रारदार पतीचं नाव साजिद कयानी आहे. कोटडा सांगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
घटनेचा क्रम
साजिद हा व्यवसायाने कामगार असून, त्याचं लग्न सहा वर्षांपूर्वी मुस्कानसोबत झालं होतं. त्यांना सहा वर्षांची नूरेना नावाची मोठी मुलगी आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची दुसरी मुलगी आयेशा जन्माला आली होती. घटनेच्या दिवशी साजिद कामावर गेल्यानंतर संध्याकाळी मुस्कानने फोन करून आयेशा पाळण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
कुटुंबियांनी शोध घेत असताना स्वयंपाकघरातील पाण्याच्या टाकीत आयेशाचा मृतदेह आढळला. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
कबुली आणि पोलिस कारवाई
सुरुवातीला प्रकरण बेपत्ता मुलीचं असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र काही दिवसांनी मुस्कानच्या भावाने साजिदला सत्य कळवलं. माहेरी असताना मुस्कानने स्वतःच्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली होती. मुलगा न झाल्याने तिनं हा टोकाचा निर्णय घेतल्याचं समोर आलं.
सुरुवातीला घटस्फोटाची मागणी करणाऱ्या साजिदनं अखेर पोलिसांकडे धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून मुस्कानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
इच्छुक उमेदवारांच्या कडे असणार नवरात्र उत्सवाचे प्रायोजकत्व
पत्नी, वडिलांच्या डोळ्यादेखत क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पंक्चर काढताना जॅक निसटला, अन्….
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची पर्यावरण पूरक प्रभात फेरी….