अमेरिका आणि भारतातील टॅरिफ युद्ध दिवसेंदिवस चिघळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निर्यातीवर तब्बल ५०% टॅरिफ लावून बाजारपेठेवर मोठा आघात केला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय कोळंबी निर्यातदारांना बसला आहे. अमेरिका ही भारतासाठी कोळंबीची सर्वात मोठी बाजारपेठ होती, पण आता त्यावर ५८% पर्यंत कर बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा कठीण काळात रशिया भारतासाठी(india) एक पर्यायी बाजारपेठ म्हणून पुढे येत आहे.

रशियाचे उपपंतप्रधान आणि कृषी विषयातील तज्ज्ञ दिमित्री पात्रुशेव या महिन्यात नवी दिल्लीला भेट देण्याची शक्यता आहे. त्यांचा दौरा केवळ औपचारिक नाही तर व्यापाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः खतांचा पुरवठा वाढवणे आणि भारतातून(india) कोळंबी आयात करणे हा त्यांच्या भेटीचा मुख्य अजेंडा आहे. भारताची कोळंबी उद्योगव्यवस्था प्रचंड मोठी आहे. दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची निर्यात केवळ अमेरिकेत केली जाते. परंतु अमेरिकन टॅरिफ वॉरमुळे निर्यातदारांचे भविष्य डळमळीत झाले आहे. त्यामुळे रशियासारख्या नवीन आणि विशाल बाजारपेठेत प्रवेश मिळणे भारतीय निर्यातदारांसाठी दिलासा देणारे ठरू शकते.

इतकेच नव्हे, तर ट्रम्प प्रशासनाने भारताविरुद्धचा दबाव वाढवला आहे. अलीकडेच झालेल्या जी-७ परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत अमेरिकेने भारत आणि चीनवर कठोर टॅरिफ लादण्याची मागणी केली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री स्कॉट बेझंट यांनी स्पष्ट केले की, “रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कर लावण्यात जी-७ ने अमेरिकेला साथ द्यावी.” अमेरिका असा दावा करते की भारत रशियाचे तेल खरेदी करून अप्रत्यक्षरित्या युक्रेनमधील युद्धाला निधी पुरवतो. मात्र भारताने हा आरोप फेटाळून लावला असून, अशा टॅरिफना “अन्याय्य” आणि “एकतर्फी” म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय(india) अर्थव्यवस्था आणि व्यापार धोरणात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पण मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, ५०% टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढील रणनीती आखत आहे. भारताने आधीच स्पष्ट केले आहे की तो “एकतर्फी दबावाला” बळी पडणार नाही. पात्रुशेव यांच्या भेटीमुळे भारत आणि रशियामधील व्यापारसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. विशेषतः कोळंबी निर्यातीसाठी रशियाचा बाजार खुला झाला तर अमेरिकन दबावाला तोड देणे शक्य होईल. तसेच खतांच्या आयातीत रशियाचे योगदान वाढल्यास भारतीय कृषी क्षेत्रालाही फायदा होणार आहे.

ट्रम्प यांची टॅरिफ नीती अल्पकालीन काळात भारतीय उद्योगांना मोठा तोटा देणारी ठरू शकते, पण यामुळे भारतासमोर नवीन दारेही उघडत आहेत. रशियाबरोबरचा व्यापार वाढल्यास भारताची निर्यात विविधीकृत होईल आणि एका देशावर अवलंबित्व कमी होईल. जगात सुरू असलेल्या या टॅरिफ युद्धात भारताचा प्रत्येक पाऊल महत्त्वाचा आहे. मोदी सरकार आता पुढील “हल्ल्याची तयारी” करत असल्याचे संकेत आहेत. म्हणजेच, अमेरिकन दबावाचा प्रतिकार करताना भारत पर्यायी बाजारपेठा शोधत आहे. या संपूर्ण परिस्थितीने स्पष्ट होते की जागतिक व्यापार केवळ आकड्यांचा खेळ नाही तर भू-राजकीय समीकरणांचेही रणांगण आहे.

हेही वाचा :

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना गुडन्यूज!

मैत्रीणीसाठी रागाच्या भरात कंपनी कर्मचाऱ्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा येऊ शकते कोरोनासारखी महामारी!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *