कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : धन्यदांडगे अशी ओळख असलेल्या इच्छुकांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जिंकण्यासाठी लागेल तितका पैसा खर्च करण्याची तयारी दाखवली जात असून त्यांनी नुकत्याच झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये त्याची चुणूक दाखवली आहे. या महिन्याच्या अखेरीस येत असलेल्या नवरात्र(Navratri) उत्सवाचे या धनदांडग्यांच्याकडे प्रायोजकत्व असणार आहे.

चार सदस्यांचा एक प्रभाग अशी पहिल्यांदाच निवडणूक पद्धत अवलंबण्यात येत आहे त्यामुळे खर्चात अनेक पटीने वाढ होणार आहे. यापूर्वी एक सदस्य प्रभाग पद्धती होती. प्रभागाचे क्षेत्र मर्यादित होते. मतदारांची संख्या साडेचार हजारापासून ते सात हजारापर्यंत होती. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना किमान 25 लाख ते कमाल 75 लाख रुपयापर्यंत खर्च करावा लागत होता. आता चार सदस्य प्रभाग पद्धती आणल्यामुळे प्रभागाच्या कक्षा वाढलेल्या आहेत.
एक सदस्य प्रभाग पद्धतीपेक्षा सध्याचे प्रभाग क्षेत्र चार पटीने वाढलेले आहे. त्यामुळे अर्थातच मतदारांची संख्या 20 हजारांपासून 30 हजारापर्यंत पोहोचलेली आहे. या निवडणुकीत अगदी चुरशीचे मतदान झाले आणि त्याची सरासरी टक्केवारी 80 पर्यंत आली तर प्रत्येक प्रभागात 16 ते 18 हजार इतके मतदान होईल. त्यामुळे निवडून येण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी 7 हजाराच्या पुढे मतै मिळवावी लागतील. इतकी मते मिळवण्याचे प्रत्येक उमेदवारासमोर आव्हान असणार आहे आणि या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अमाप पैसा खर्च करण्याची तयारी दाखवावी लागणार आहे.
आपण उमेदवार आहोत हे अप्रत्यक्षपणे जाहीर करण्यासाठी जे धनदांडगे उमेदवार आहेत ते मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना विस्तारलेल्या प्रभागात नवरात्र उत्सव मंडळाच्या प्रत्येक मंडपा समोर आपले डिजिटल फलक लावावे लागणार आहेत किंबहुना मोठ्या मंडळांचे नवरात्र (Navratri)उत्सवाचे प्रायोजकत्व त्यांना घ्यावे लागणार आहे.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचे प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरण घ्यायचे झाले तर इथे ग्रामपंचायतची निवडणूक लढवण्यासाठी काही लाखापर्यंत खर्च करावा लागतो. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या यावर निवडून जाण्यासाठी ग्रामीण भागात हाच खर्च किमान 25 लाखापर्यंत किंवा त्याही पुढे जाऊन पोहोचतो.
कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी महानगरपालिका या दोन मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला अगदी कमीत कमी 25 लाख खर्च करावा लागणार आहे. हा जास्तीत जास्त खर्च एक कोटी पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्याच्या हातातून केव्हाच निसटून गेलेली आहे.
हेही वाचा :
‘मी विवस्त्र होऊन मैदानात…’, क्रिकेटर बापाचं विधान ऐकताच
मोदीजी अॅक्शन मोडमध्ये! ट्रम्पच्या 50% टॅरिफवर करणार पुढचा हल्ला
ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा येऊ शकते कोरोनासारखी महामारी!