येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल(School) मध्ये माझी वसुंधरा अभियान ६.० व “इको क्लब”अंतर्गत इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींच्या पर्यावरण पूरक घोषवाक्य बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थिनींनी त्या घोषवाक्यांचे पोस्टर बनविले.

समाजामध्ये पर्यावरण पूरक जागरूकता निर्माण होण्यासाठी सदर पोस्टरचा उपयोग करून आज सकाळी विद्यार्थिनींनी मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढली. यामध्ये विद्यार्थिनींनी ”कचऱ्याचे वर्गीकरण – स्वच्छतेचे संवर्धन”, “प्लास्टिकला नकार- पर्यावरणाचा आधार”, ”ऊर्जा वाचवा- जीवन वाचवा”,Love food- Hate Waste”,यासारख्या अनेकविध पर्यावरण पूरक घोषणा दिल्या.
त्यानंतर इको क्लबच्या योजना प्रमुख शिक्षिका सौ.आर.एस.रॉड्रीग्युस यांनी सर्व विद्यार्थिनींना ऊर्जा बचत,कचऱ्याचे संवर्धन व जलप्रतिज्ञा यांची शपथ देऊन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले(School). यावेळी मुख्याध्यापिका सौ.ए.एस.काजी, पर्यवेक्षिका सौ.व्हि.एस. लोटके,पर्यवेक्षक एस.एस.कोळी, के.ए.पाटील,डी.डी.कोळी, एस.एच.मुजावर, एम.आर.चव्हाण,एस.एस.देशपांडे यांच्यासह सर्व शिक्षक बंधु-भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
हेही वाचा :
‘मी विवस्त्र होऊन मैदानात…’, क्रिकेटर बापाचं विधान ऐकताच
पत्नी, वडिलांच्या डोळ्यादेखत क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पंक्चर काढताना जॅक निसटला, अन्….
इच्छुक उमेदवारांच्या कडे असणार नवरात्र उत्सवाचे प्रायोजकत्व