रविवारी दुबईमध्ये झालेल्या आशिया कप 2025 च्या सामन्यात पाकिस्तानला सात विकेट्सनी हरवून शानदार विजयी मिळवला. आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान(cricketer) मॅच होऊ नये म्हणून भारतीयांनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलं होतं. पण हा सामना खेळवला गेला तेव्हा टीम इंडियाच्या खेळाडूंनी जे केलं त्याच सर्वत्र कौतुक होतं आहे. टॉस दरम्यान आणि मॅचदरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तान कर्णधार सलमान आगाकडे दुर्लक्ष केलं.

एवढंच नाही यावेळी सूर्यकुमान याने सलमानशी हस्तांदोलन केलं नाही. त्यानंतर सामन्यातील या नो हँडशेकची सर्वाधिक चर्चा झाली. कारण किक्रेटच्या मैदानात टॉस झाल्यानंतर दोन्ही टीमचे कर्णधार हस्तांदोलन करतात. पण पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून सूर्यकुमार याने घेतलेली ही भूमिका खूप महत्त्वपूर्ण मानली जातेय.

एवढंच नाही तर पुरस्कार सोहळ्यानंतरही सूर्यकुमार(cricketer) यादवने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. आशिया कपमधील हा विजय देशासाठी एक मोठी भेट आहे. आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांसोबत उभे आहोत, आम्ही आमची एकता व्यक्त करतो आणि आजचा विजय सशस्त्र दलांना समर्पित करू इच्छितो.

पाकिस्तानचे व्हाईट-बॉल हेड कोच माइक हेसन म्हणाले की, सामन्याच्या शेवटी भारतीय संघाचे वर्तन ‘निराशाजनक’ असल्याने पाकिस्तानचा कर्णधार समारंभाला गेला नाही. हेसन म्हणाला, सामन्याच्या शेवटी हस्तांदोलन आणि मैत्रीपूर्ण संभाषण करण्यास आम्ही स्पष्टपणे उत्सुक होतो, पण तसं झालं नाही.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) डॉन डॉट कॉमला पुष्टी दिली की पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नवीद अख्तर चीमा यांनी भारतीय संघाच्या अयोग्य वर्तनाविरुद्ध अधिकृतपणे निषेध नोंदवला आहे. पीसीबीने सांगितले, मॅनेजर चीमा यांनी मॅच रेफरीच्या वर्तनाविरुद्ध अधिकृत निषेध नोंदवला आहे, कारण त्यांनी दोन्ही कर्णधारांना टॉस दरम्यान हस्तांदोलन न करण्याची विनंती केली होती. दरम्यान टीम इंडियाने विरोधी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानचे संघ व्यवस्थापक नवीद अक्रम चीमा यांनी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली.

सूर्यकुमार यादव आणि सलमान यांनीही टॉस नंतर हस्तांदोलन केले नाही. या घटनेमुळे अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनाही संतापले आहेत. लतीफ यांनी भारतीय संघाविरुद्ध आयसीसीकडे कारवाईची मागणी केली आहे. लतीफ यांनी एका टीव्ही शोमध्ये म्हटलंय की, ‘आमचे खेळाडू गेले होते, पण ते जाणूनबुजून ड्रेसिंग रूममध्ये खूप लवकर गेले होते. टॉस दरम्यानही हस्तांदोलन झाले नाही. आयसीसीने यावर कारवाई करावी. हा कार्यक्रम एसीसीचा आहे, त्याचे अध्यक्ष आमचे नक्वी साहब देखील आहेत, त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी.’

हेही वाचा :

“मला संपवायचा प्रयत्न होता”; अशोक चव्हाणांचा खळबळजनक दावा

टीम इंडियाची Hockey Asia Cup 2025, च्या अंतिम फेरीत धडक

वंशाच्या दिव्यासाठी आईनं पोटच्या २ महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं; पाण्याच्या टाकीत बुडवलं

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *