टीम इंडियाचा युवा क्रिकेटर सरफराज खान सध्या सोशल मीडियावर(social media) चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, सरफराजने नुकताच आपला टॉपलेस फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ज्याला अनेकदा ‘अनफिट’ म्हटलं जात होतं, तोच आता आपल्या परफेक्ट बॉडी आणि फिटनेसने चाहत्यांना थक्क करत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टेस्ट मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. अजून स्क्वॉडची अधिकृत घोषणा झालेली नाही, पण सरफराजला संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी तो सरावाबरोबरच फिटनेसवरही मोठं लक्ष केंद्रीत करत आहे.

काही दिवसांपूर्वीच सरफराजने बेंगळुरूमधील एनसीएमध्ये रोहित शर्मासोबतचा फोटो पोस्ट करत चर्चेला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने शर्टलेस फोटो शेअर केला आणि काही क्षणांतच सोशल मीडियावर(social media) धुमाकूळ घातला. चाहत्यांनी त्याच्या मेहनतीचं आणि तयारीचं भरभरून कौतुक केलं आहे.

Sarfaraz Khan Topless Picture

दमदार कामगिरीने केला प्रभाव
सरफराजने नुकत्याच झालेल्या बुची बाबू स्पर्धेत हरियाणाविरुद्ध नाबाद 109 धावा (109 चेंडूत) ठोकल्या. मुंबईची अवस्था संकटात असताना त्याने हार्दिक तमोरेसोबत 117 धावांची भागीदारी करत संघाला सावरलं. या खेळीमध्ये नऊ चौकार आणि पाच षटकार होते. याआधीच त्याने टीएनसीए XI विरुद्ध 138 धावांची धमाकेदार खेळी केली होती.

रोहित शर्माही सरावात व्यस्त
दरम्यान, रोहित शर्मा देखील सरावात मग्न असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीनंतर तो सात महिन्यांहून अधिक काळानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणार आहे. सरफराजच्या फिटनेस आणि सततच्या उत्तम कामगिरीमुळे, चाहत्यांना आता त्याचा टीम इंडियामध्ये प्रवेश लवकरच होईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

सांगलीत पॉलिशच्या बहाण्याने तीन लाखांचे सोने लंपास

रीलच्या नादात तरुणाला दोऱ्याने लटकवलं, मुलीला पाण्यात बुडवलं; Video Viral

18 वर्षांहून कमी वयाच्या युजर्ससाठी लवकरच लाँच होणार ChatGPT चं नवं वर्जन!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *