ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (sports updates)दुसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात भारताची दिग्गज स्मृती मानधनाने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली आहे. तिने या सामन्यात शानदार शतक लगावले आहे.

तिने आपल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध जोरदार मोर्चा वळवला. तिच्या खेळीदरम्यान मानधनाने एक अनोखा विक्रम रचला आहे. मानधनाने महिला एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक ५०+ धावा काढणारी पाचवी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. मानधनाने दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डचा विक्रम मागे टाकला आहे.

स्मृती मानधनाने दुसऱ्या सामन्यात (sports updates)शानदार ११७ धावा केल्या आहेत. यामध्ये तिने ९१ चेंडूचा सामाना करत ११७ धावा केल्या. या खेळीत १४ चौकार आणि ४ षटकार लगावले आहेत. स्मृती मानधना आता ४४ वेळा ५०+ धावा केल्या आहेत. लॉरा वोल्वार्डने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीमध्ये ४३ वेळा ५०+ धावा केल्या आहेत. मिताली राज ही महिला एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारी महिला फलंदाज आहे. भारताच्या स्टार माजी मिताली राजने ७१ वेळा ५०+ धावा करण्याची किमया साधली आहे.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, भारताच्या मानधनाने पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये ५८ धावा केल्या होत्या. आता, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मानधनाने शानदार शतक झळकवले आहे. या खेळीने खेळीने क्रिकेट जगताला तिने आश्चर्यचकित केले आहे.

वेस्ट इंडिज कसोटी सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. माजी कर्णधार क्रेग ब्रेथवेटला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे. यामध्ये तेगनारायण चंद्रपॉल आणि अ‍ॅलिक अथानासे हे कसोटी संघामध्ये स्थान देण्यात आले आहेत. वेस्ट इंडिज ऑक्टोबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना २ ते ६ ऑक्टोबर आणि दुसरा १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा :

पत्नीच्या बहिणीला घेऊन पळाला, दुसऱ्याच दिवशी त्याची बहिण…

‘तो वाटेतच मरेल…’ जॅकी दादांनी शेअर केला ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ

मोठी बातमी! मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, मनोज जरांगे पाटलांनी केली घोषणा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *