पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संबंध ताणलेले असताना भारताने पाकिस्तानविरोधात क्रिकेट(sports news)खेळू नये असा सूर असतानाही आशिया कपमध्ये भारताने सामना खेळला. भारताने पाकिस्तानवर 7 गडी आणि 25 चेंडू राखून मात केली आणि सामना जिंकला. यानंतर सूर्यकुमारने हा विजय पहलगाममधील पीडितांना आणि भारतीय लष्कर जवनांना समर्पित केला. दरम्यान या विजयानंतर आता कर्णधार सूर्यकुमार यादवला जाहीर आव्हान देण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादवला आव्हान देताना त्याची लायकीच काढण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) नेते सौरभ भारद्वाज यांनी पहलगाम पीडितांना श्रद्धांजली वाहणाऱ्या भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार(sports news) यादववर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सूर्यकुमारला सामन्यातील सर्व कमाई पीडितांच्या कुटुंबियांना दान करण्याचं थेट आव्हानच दिलं आहे.

“त्याने अत्यंत सहजपणे हा विजय पहलगाम हल्ल्यातील मृतांना समर्पित करत असल्याचं म्हटलं. तू फारच समजूतदार आहे. जर तुझी इतकी लायकी आहे, बीसीसीआय, आयसीसीची जर हीच औकात आहे तर तुम्हाला दुसरं आव्हानही देतो. जितका पैसा तुम्ही प्रसारण हक्कातून कमावला आहे, जाहिरातीतून कमावला आहे, तसंच या धंद्यातून कमावला आहे तो 26 विध्वांना देऊन टाका, आम्हीही मानू की तुम्ही समर्पित केलं आहे,” असं आव्हान त्यांनी दिलं आहे.

पुढे ते म्हणाले “यांची हिंमत नाही, औकात नाही की काही करु शकतात. उगाच आपलं आम्ही याला समर्पित करत आहोत, त्याला समर्पित करत आहोत असं सांगत राहायचं. हे फारच लाजिरवाणं आहे”.

रविवारी, सोशल मीडियावर बहिष्काराच्या आवाहनांना तोंड द्यावे लागलेल्या सामन्यात भारताने सात विकेट्सने विजय मिळवला, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने या सामन्याला सहमती दर्शविल्याबद्दल जोरदार टीका करण्यात आली.

सामन्यानंतर, सूर्यकुमार यादवने हा विजय “ऑपरेशन सिंदूर” मध्ये भाग घेतलेल्या आपल्या सशस्त्र दलांना समर्पित केला आणि सांगितलं की संघ “पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे”. शिवाय, भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. टॉसच्या वेळीही, सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नाही.

भारद्वाज यांच्या विधानावर सूर्यकुमरा यादव, बीसीसीआय किंवा आयसीसीकडून कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया आली नाही. भारताच्या पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच्या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाला (भाजप) विरोधकांसह अनेकांच्या टीकेचा सामना करावा लागला. “जेव्हा आम्ही (भारत) पाकिस्तान दहशतवादाचा गुन्हेगार असल्याचे म्हटले, तेव्हा जग तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तुम्ही पाकिस्तानचे शत्रू आहात की मित्र? जर तुम्ही त्यांचे शत्रू असाल तर सर्व संबंध तोडून टाका,” असे शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :

पत्नीच्या बहिणीला घेऊन पळाला, दुसऱ्याच दिवशी त्याची बहिण…

‘तो वाटेतच मरेल…’ जॅकी दादांनी शेअर केला ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ

मोठी बातमी! मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, मनोज जरांगे पाटलांनी केली घोषणा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *