थायलंडमध्ये एका 35 वर्षीय महिलेने, जिने ‘मिस गोल्फ’ म्हणून ओळख मिळवली, धार्मिक आणि सामाजिक रचनेला हादरवून टाकणारा मोठा ब्लॅकमेलिंग प्रकरण उघड केला आहे. विलावन एम्सावट उर्फ ‘मिस गोल्फ’ने 2019 पासून अनेक श्रीमंत आणि वरिष्ठ बौद्ध भिक्षूंना सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून, त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ(video) तयार केले आणि नंतर त्यांचा वापर करून पैसे उकळले.

पोलिसांच्या मते, तिने सुमारे 15 वरिष्ठ भिक्षूंशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि गर्भवती असल्याचा दावा करून लाखो थाई बाट (सुमारे 102 कोटी रुपये) मागितले. या फसवणुकीत तिने 80,000 फोटो आणि 5,600 व्हिडिओ तयार केले. अनेक भिक्षू तिच्या जाळ्यात अडकले आणि तिने 385 मिलियन थाई बाट कमावले.

पोलिसांनी तिला बँकॉकजवळील नॉन्थाबुरी येथून अटक केली आहे. तिच्या जवळून पाच मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून, त्यातून सर्व व्हिडिओ(video), फोटो आणि चॅट रेकॉर्ड्स मिळाले आहेत. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, ज्यामुळे थायलंडमधील धार्मिक संस्था आणि समाजावर मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा :
राजकीय वातावरण तापलं! ‘या’ कारणामुळे शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन
प्रायव्हेट फोटोवरून ब्लॅकमेल, छळाला कंटाळून प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या;
‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या