सासरी हुंड्याची मागणी, रोजचा तो जाच आणि असहाय्य वेदना… शेवटी तिने निर्णय घेतलाच. आत्महत्येचा प्रयत्न केला खरा पण जीव वाचताच कुटुंबाने जे केलं, व्हिडिओतील(Video) आक्रोश ऐकून तुमचंही मन हेलावून जाईल.हुंड्याची प्रथा फार पूर्वीपासून भारतात सुरु आहे पण काळासोबत अनेक बदल होत असतानाच ही प्रथा हळूहळू बंद होऊ लागली. देशात हुंडा घेणं आणि हुंडा देणं हे दोन्हींनी बेकायदेशीर आहे पण तरीही काही भागांत अजूनही हुंड्याची प्रथा अजूनही सुरु आहे. हुंडाबळीमुळे अनेक महिलांनी आपला जीव गमावला आहे पण तरीही अजूनही ही प्रथा पूर्णपणे संपुष्ठात आली नाही. मागेच वैष्णवी हगवणे प्रकरण फार पेटलं ज्यात हुंडापायी तरुणीने आत्महत्या करण्याची घटना घडली.

आताही अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात महिलेने सासरकडच्या लोकांच्या जाचाला कंटाळत आपल्याच घराच्या छतावरून कोसळत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात महिला वाचली खरी पण खरी धक्कादायक घटना यांनतर घडली. महिलेने छतावरून उडी मारताच ती खाली पडली तिचा यात जीवही वाचला पण यानंतर तिला डॉक्टरांकडे न नेता तिच्या घरच्यांनी तिला तिथेच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सदर घटना भीषण असून यातील दृश्ये आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहेत. चला व्हिडिओत काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.
यूपी के अलीगढ़ में एक महिला को उसके पति और ससुराल वालों ने दहेज के लिए इतना परेशान किया कि वह मजबूर होकर पहली मंज़िल से कूद गई। ज़मीन पर मुँह के बल गिरी, गंभीर रूप से घायल हुई, फिर भी बच्चों के सामने उसकी बेरहमी से पिटाई की गई..💔
— Zoya khan (@Zoyakhan7025) September 3, 2025
यही है हमारा समाज जहाँ एलिमनी पर बवाल मचता है,… pic.twitter.com/TXgFtjElm4
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत(Video) आपण पाहू शकता, यात दिसते की एक महिला घराच्या छतावर उभी आहे. यावेळी काही लोक तिला आवाज देऊन खाली उतरण्याचा सल्ला देतात पण कुटुंबाच्या जाचाला ती इतकी कंटाळली असते की कुणाचंही काहीही न ऐकता ती छतावरून खाली उडी मारते. उडी मारताच ती खाली जोरदार आदळते आपण यात तिचा जीव वाचतो. ती जिवंत आहे हे जाणवताच सासरची मंडळी तिच्यावर अजून रागवतात आणि पुढच्याच क्षणी तिला मारहाण करण्यास सुरुवात करतात. व्हिडिओत महिलेच्या ओरडण्याच्या आणि दुःखाचा आक्रोश स्पष्ट कानी पडतो जो अंगावर शहारा आणण्यासारखा आहे. माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे घडून आली आहे.

घटनेचा व्हिडिओ @Zoyakhan7025 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “राक्षस लोक अजूनही भरून पडले आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बहिणी, हे ऐकून माझे हृदय हेलावून जाते. एक स्त्री ही एक आई असते, एक मुलगी असते आणि एक बहीण असते. तिच्या सन्मानाचे रक्षण करणे हीच खरी मानवता आहे. देव अशा क्रूर लोकांना शिक्षा करो आणि प्रत्येक मुलीचे रक्षण करो”.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींवर सरकारचा लेटरबॉम्ब आता ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार
20 हजार रुपये भरा, Hero Splendor Plus घरी न्या,
5 वर्षात 2545 टक्के परतावा, ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने मालामाल केले,