भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण पेटलं आहे. या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीत प्रचंड संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली(political).

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना म्हंटल आहे की, “अशी टीका करणं योग्य नाही. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.” असं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. पवार गटात यामुळे मोठा आक्रोश असून, ठिकठिकाणी मोर्चे काढण्याची तयारी असल्याचं कळतं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचाही अपमान केला. “जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही… माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे, ये बघायला, तुझे डोळे दिपून जातील,” अशा शब्दांत पडळकरांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं.

पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू असून, एकमेकांवर टीका केली जात होती. मात्र, यावेळी वापरलेली भाषा अत्यंत खालच्या थराची असल्याने राष्ट्रवादी पवार गटातील कार्यकर्त्यांत संताप उफाळून आला आहे.
या घडामोडीनंतर पवार गट आक्रमक झाला आहे. कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली असून, राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे(political).

हेही वाचा :

‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या

Nothing ईअरबड्स लॉन्च: 22 हजारांखाली नवीन सुपर माइक फीचर

हायकोर्टाला पुन्हा बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून अलर्ट जारी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *