पेन्शन घेणाऱ्यांसाठी (pensioners)एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता त्यांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. भारत सरकार पेन्शन आणि पेन्शनर कल्याण विभाग लवकरच ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कॅम्पैन 4.0’ सुरू करणार आहे.

या मोहिमेअंतर्गत 1 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत देशभरातील 1600 जिल्ह्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित केली जातील. या शिबिरांमधून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग पेन्शनधारकांना त्यांच्या घरी जाऊन ही सुविधा दिली जाणार आहे. या नव्या सुविधेमुळे पेन्शनधारकांना आता घरबसल्या ‘फेस ऑथेंटिकेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करून आपले जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य होणार आहे. यामुळे विशेषतः वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्तींसाठी ही प्रक्रिया अत्यंत सोपी होणार आहे.

पेन्शनधारकांना (pensioners)दरवर्षी 1 ते 30 नोव्हेंबर या काळात आपले जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. जर हे प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही, तर त्यांची पेन्शन थांबवली जाऊ शकते. आतापर्यंत हे काम करण्यासाठी सरकारी कार्यालयात जावे लागत होते. पण ‘फेस ऑथेंटिकेशन’मुळे ही अडचण दूर झाली आहे. ‘फेस ऑथेंटिकेशन’ हे एक बायोमेट्रिक तंत्रज्ञान आहे. यात तुमच्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून तुमचा चेहरा थेट स्कॅन केला जातो आणि त्याची पडताळणी आधीच नोंद असलेल्या तुमच्या आधार कार्डवरील माहितीशी केली जाते. यामुळे ओळख पटवण्याची प्रक्रिया जलद आणि सुरक्षित होते.

घरी बसून प्रमाणपत्र जमा करण्याची संपूर्ण प्रक्रिया:

स्टेप 1: ‘आधार फेस आरडी’ ॲप डाउनलोड करा

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये UIDAI ने तयार केलेले ‘Aadhaar Face RD Application’ नावाचे ॲप डाउनलोड करावे लागेल. हे ॲप तुमच्या फोनमध्ये बॅकग्राउंडमध्ये काम करते आणि ‘जीवन प्रमाण ॲप’साठी आवश्यक आहे.

स्टेप 2: ‘जीवन प्रमाण ॲप’ डाउनलोड करा

‘आधार फेस आरडी’ ॲप इंस्टॉल झाल्यावर तुम्हाला तुमच्या फोनवर ‘जीवन प्रमाण ॲप’ डाउनलोड करावे लागेल. याच ॲपचा वापर करून तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करणार आहात.

स्टेप 3: ‘जीवन प्रमाण ॲप’मध्ये नोंदणी करा

ॲप उघडल्यावर तुम्हाला ‘ऑपरेटर ऑथेंटिकेशन’ स्क्रीन दिसेल.

येथे आधार नंबर टाका, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस भरा.

‘सबमिट’ बटण दाबा.

यानंतर, तुमच्या मोबाईल आणि ईमेलवर एक ओटीपी येईल. तो ॲपमध्ये टाकून ‘सबमिट’ करा.

स्टेप 4: चेहरा स्कॅन करण्यासाठी तयारी
ओटीपी टाकल्यावर नवीन स्क्रीन येईल. येथे आधार कार्डवरील तुमचे नाव टाका.

चेक बॉक्सवर टॅप करून ‘स्कॅन’ पर्याय निवडा.

ॲप तुमच्या चेहऱ्याचा स्कॅन करण्यासाठी परवानगी मागेल, त्याला ‘येस’ म्हणा.

स्टेप 5: चेहरा स्कॅन करा
काही सूचना दिसतील. ‘I am aware of this’ वर टॅप करून ‘प्रोसीड’ करा.

तुमचा चेहरा योग्य प्रकारे स्कॅन करण्यासाठी सांगितलेल्या सूचनांचे पालन करा.

स्टेप 6: पेन्शनर ऑथेंटिकेशन
चेहरा स्कॅन झाल्यावर ‘पेन्शनर ऑथेंटिकेशन’ स्क्रीन उघडेल.

येथे विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा.

तुमचा चेहरा पुन्हा एकदा स्कॅन केला जाईल. यानंतर, तुम्हाला एक ‘प्रमाण आयडी’ आणि ‘पीपीओ नंबर’ मिळेल.

स्टेप 7: सर्टिफिकेट डाउनलोड करा

शेवटी, तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी जीवन प्रमाणच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तेथे लॉग इन करून ‘प्रमाण आयडी’ टाका. लगेचच तुमचे सर्टिफिकेट डाउनलोड होईल. या सुविधेमुळे आता पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे अत्यंत सोपे आणि त्रासमुक्त झाले आहे.

हेही वाचा :

राजकीय वातावरण तापलं! ‘या’ कारणामुळे शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

प्रायव्हेट फोटोवरून ब्लॅकमेल, छळाला कंटाळून प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या;

‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *