22 सप्टेंबरनंतर लागू होणाऱ्या GST Reforms अंतर्गत अनेक वस्तूंवर नवीन दर लागू होणार आहेत. मात्र एलपीजी गॅस सिलेंडरच्या(cylinder) किंमतींवर याचा काही परिणाम होणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडर

सबसिडी असलेल्या सिलेंडरवर(cylinder) 5% जीएसटी लागू राहणार आहे.

सबसिडी नसलेल्या घरगुती सिलेंडरवर देखील 5% जीएसटी लागू राहील.

यामुळे सामान्य ग्राहकांना किंमतीत कोणताही दिलासा मिळणार नाही.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर

हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्न उद्योगांसाठी वापरल्या जाणार्‍या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर 18% जीएसटी लागणार आहे.

यामुळे व्यावसायिक ग्राहकांना देखील जीएसटी कपातीचा फायदा होणार नाही.

परिस्थिती स्पष्ट

3 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेच्या बैठकीत एलपीजी सिलेंडरवरील (cylinder)जीएसटी दरात कोणताही बदल झाला नाही.

त्यामुळे 22 सप्टेंबरनंतर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये कोणताही फरक दिसणार नाही.

गेल्या काही वर्षांत एलपीजी सिलेंडरच्या किंमती दुप्पट झाल्यामुळे ग्राहकांची नाराजी वाढली आहे. नागरिकांसाठी दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, पण एलपीजी गॅसच्या बाबतीत नवीन जीएसटी सुधारणा किंमत स्थिर ठेवण्यासाठीच आहेत.

हेही वाचा :

19 वर्षाच्या तरुणाला सोशल मिडिया बॅन, थेट उच्च न्यायालयाकडून कारवाई

प्रेग्नेंट कतरिना कैफचा पहिला फोटो तुफान व्हायरल….

इंजिन ऑईल पिऊन जगतोय हा माणूस Viral Video…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *