सरकारी टेलिकॉम(telecom ) कंपनी BSNL भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. यासाठी BSNL नवीन रिचार्ज प्लॅन, 5G सर्विस, इंटरनेट डेटा ऑफर सुरु करत आहे. ज्यामुळे त्यांच्या युजर्सना चांगली सर्विस मिळावी आणि नवीन युजर्स जोडले जावेत, हा यामागील उद्देश आहे. याशिवाय कंपनी नवीन रिचार्ज प्लॅन्स आणि स्पेशल ऑफर्स देखील सुरु करत आहे. आता देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन ऑफर सुरु केली आहे.

मोबाईल युजर्ससाठी फायद्याची ऑफर
अलीकडेच कंपनीने एक नवीन ऑफर सुरु केली आहे, ही ऑफर जियो, एयरटेल आणि Vi ला टक्कर देत आहे. कंपनी या ऑफरमध्ये त्यांच्या युजर्सना जास्तीचा डेटा आणि अधिक चांगले बेनिफिट्स देत आहे. खाजगी टेलिकॉम (telecom )कंपन्यांच्या तुलनेत कंपनीची ही नवीन ऑफर मोबाईल युजर्ससाठी फायद्याची ठरणार आहे. अशाच काही ऑफरचा फायदा युजर्सना मिळावा यासाठी BSNL ने फ्लॅश सेल सुरु केला आहे.
BSNL प्लॅश सेल
BSNL ने सुरु केलेला हा प्लॅश सेल लिमीटेड वेळेसाठी आहे. हा सेल 28 जूनपासून सुरु झाला असून सेलची शेवटची तारीख 1 जुलै आहे. या सेलदरम्यान युजर्सना अनेक फायदे मिळणार आहेत. या सेलमध्ये कंपनी युजर्सना केवळ 400 रुपयांत 400 जीबी डेटा ऑफर करत आहे. हा प्लॅन 40 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह ऑफर केला जातो. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला बीएसएनएलची वेबसाइट किंवा बीएसएनएल सेल्फ केयर अॅपला भेट द्यावी लागणार आहे.
एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
बीएसएनएलने अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. कंपनीने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बीएसएनएल 90 हजार 4G टॉवर बसवण्याच्या तयारीत आहे, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कंपनीने याचं यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी फ्लॅश सेलची घोषणा केली आणि सांगितले की यूजर्सना फक्त 400 रुपयांमध्ये 400 जीबी डेटा मिळू शकेल.

याची व्हॅलिडिटी 40 दिवसांची असणार आहे. यासोबतच कंपनीने असं देखील सांगितलं आहे की, एवढ्या कमी पैशांत इतका डेटा तुम्हाला इतर कुठेही ऑफर केला जाणार नाही. ही ऑफर 28 जूनपासून सुरु झाली असून 1 जुलैपर्यंत असणार आहे. तुम्ही ही ऑफर मिस करू नका. कंपनीची ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.
कंपनीने क्वांटम 5G देखील केला सादर
अलीकडेच BSNL ने त्यांचे क्वांटम 5G देखील सादर केले आहे, ज्यासोबतच कंपनीने देशातील पहिली 5G फिक्स्ड वायरलेस एक्सेस सर्विस देखील सुरु केली आहे, ज्याला पूर्णपणे स्वदेशी टेक्नोलॉजीच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. मात्र ही सर्विस सामान्य युजर्ससाठी उपलब्ध नाही. सध्या, ही सेवा फक्त व्यवसाय आणि एंटरप्राइझ यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या क्वांटम 5G सेवेची सुरुवातीची किंमत दरमहा 999 रुपये आहे.
हेही वाचा :