आशिया कप 2025 मधील ग्रुप-स्टेज सामन्यात भारताने ओमानवर 21 धावांनी विजय मिळवला, पण टीम इंडियाचा(India) उपकर्णधार शुभमन गिलची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक ठरली. गिल फक्त 5 धावा करून बोल्ड झाला आणि चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केलं. फक्त एवढंच नाही, तर हेड कोच गौतम गंभीरवरही टीका करण्यात आली.

शुभमन गिलने ग्रुप-स्टेजमधील तीनही सामन्यांत मिळून केवळ 35 धावा केल्या आहेत. यूएईविरुद्ध तो 20 धावांवर नाबाद राहिला होता, पण पाकिस्तानविरुद्ध 10 आणि ओमानविरुद्ध फक्त 5 धावांवर बाद झाला. सलग दुसऱ्यांदा त्याचा बॅट फ्लॉप ठरल्यामुळे चाहत्यांचा राग ट्विटरवर उसळला. अनेकांनी त्याचं निवडणं गौतम गंभीरमुळे झालं असल्याचा आरोप केला.
टूर्नामेंटच्या आधीपासूनच गिलच्या स्थानावर प्रश्नचिन्ह होतं. अलीकडे संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने सलामीला चांगली कामगिरी केली होती, पण अचानक गिलला ओपनिंगला परत आणलं गेलं. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र तो त्या पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे चाहत्यांनी पुन्हा एकदा ‘सॅमसनवर अन्याय’ झाल्याचं म्हटलं.ओमानचा गोलंदाज फैसल शाहच्या चेंडूवर गिल गंडला. सरळ टप्प्यावर पडलेला चेंडू स्टंप्स उडवत गेला. गिलची ही विकेट पाहून सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस पडला. काहींनी तर त्याला ‘फ्रॉड’ म्हणत खिल्ली उडवली.
जरी गिल फ्लॉप ठरला, तरी संजू सॅमसननं दमदार खेळी केली. त्यानं 45 चेंडूत 56 धावा ठोकल्या, ज्यात 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तिलक वर्मानंही 18 चेंडूत जलदगती 29 धावा केल्या. भारताने 20 षटकांत 188 धावा उभ्या केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ओमाननं सुरुवात चांगली केली. कर्णधार जतिंदर सिंह (32) आणि आमिर कलीम (64) यांच्यातील भागीदारीनं भारताला(India) धक्का दिला.

त्यानंतर हम्म्द मिर्झानं फटकेबाजी करत 33 चेंडूत 51 धावा ठोकल्या. शेवटी भारतीय (India)गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत ओमानला 167 वर रोखलं आणि सामना 21 धावांनी जिंकला.जगातील क्रमांक-1 संघ भारताला अशी झुंज देणं, ही ओमानसाठी मोठी गोष्ट आहे. सामना जरी हरला तरी त्यांच्या लढाऊ वृत्तीचं कौतुक होत आहे.
हेही वाचा :
छगन भुजबळांचा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांच्यामागे पवार?
रिकाम्या पोटी संत्रीचा ज्यूस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे वाचा, एकदा…
‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री मोठ्या चित्रपटातून बाहेर….