भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलयांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणात त्यांनी माफी मागण्यास नकार देत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले होते(politics).

पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वाळवा तालुक्यात तीव्र निषेध करण्यात आला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली होती. यानंतर फडणवीस यांनी पडळकरांना फोन केल्याची माहिती समोर आली होती. आता बापू बिरू वाटेगावकर (यांचे पुत्र शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना थेट इशारा देत दम भरला आहे.

शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांच्या वक्तव्याबाबत म्हटले आहे की, “तू जयंत पाटलांविरुद्ध काहीतरी बोलतो. तो माणूस तुला काही आलतू फालतू वाटला का? तू वाळवा तालुक्यात यायचा विचार कर, तुझे कपडे काढूनच तुला परत पाठवतो. तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखव. तुला समाजात काडीचीही किंमत नाही.” वाटेगावकरांनी पुढे म्हटले की, “त्याने (पडळकर) धनगर समाजाला मान खाली घालायला लावली आहे. बापूंसारख्यांवर तो बोलतो, एवढा मोठा झाला का तू?” असा हल्लाबोल त्यांनी चढवला. वाटेगावकर यांनी पडळकरांना वाळवा तालुक्यात आल्यास ‘तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही’ असा इशारा दिला आहे.

या प्रकरणी शरद पवार गटानेही गोपीचंद पडळकरांवर टीका केली असून, राज्यभर आंदोलने सुरू आहेत. खुद्द शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती आणि फडणवीस यांनी पडळकरांना समज दिल्याचे समोर आले आहे(politics).

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत म्हटले आहे की, “गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले आहे, ते योग्य आहे, असे माझेही मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणे योग्य नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “मी या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे आणि त्यांनाही (पडळकर) मी हेच सांगितले आहे. मला शरद पवारांचा फोन आला होता. मीही त्यांना सांगितले की, अशा प्रकारच्या विधानाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही.”

हेही वाचा :

इचलकरंजी : कबनूर येथे पतीपत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Swiggy आणि Instamart वर मेगा सेल, खरेदीवर मिळणार तब्बल 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट

जया बच्चन यांना नाही आवडत ऐश्वर्या? बच्चन कुटुंबाचं सत्य अखेर समोर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *