बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंच्या जवळचा मानला जाणारा कार्यकर्ता वाल्मिक कराड अटकेत आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांकडून सतत राजीनाम्याची मागणी होत असताना अखेर धनंजय मुंडेंनी प्रकृतीचं कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता(politics).

मात्र, आता पुन्हा एकदा मुंडे यांनी मंत्रिपदाची आस स्पष्ट केली आहे. रायगडमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते खासदार सुनील तटकरे यांच्या जाहीर सत्कार सोहळ्यात मुंडे यांनी याबाबत थेट वक्तव्य केले.
मुंडे म्हणाले, “मी आज जे काही आहे, ते सुनील तटकरे यांच्यामुळेच आहे. माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या.”
त्यांनी तटकरे यांना ‘कोकणचा विकासपुरुष’ असे संबोधत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “राजकीय प्रवासात वडील नसताना सुनील तटकरे यांनी मला आधार दिला. महाराष्ट्राच्या मातीत नेमकं काय चाललं आहे याची त्यांना अचूक जाण आहे,” असे मुंडे म्हणाले(politics).

दरम्यान, मुंडेंच्या या भावनिक आणि उघड मागणीमुळे रायगडच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार का? त्यांना नव्या आणि मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी…..
अखेर सूरज चव्हाणला भेटली त्याची ‘बच्चा’,
तरुण वयात केस पांढरे झाले आहेत?