अखेर सूरज चव्हाणला त्याची लाइफ पार्टनर भेटली (partner)असून आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने या लग्नाची माहिती दिली असून, चाहत्यांना खुश केलं आहे.

अखेर सूरज चव्हाणला भेटली त्याची ‘बच्चा’
अंकिताने शेअर केला वहिनीसोबतचा फोटो
कोण आहे सूरज चव्हाणची होणारी बायको?
लोकप्रिय मराठी रिॲलिटी शो बिग बॉस मधील(partner) सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण नुकताच चर्चेत आला आहे. सुरजने काही दिवसांआधी एका मुलीसोबतचा फोटो शेअर करून चाहत्यांना चकीत केले. त्यानंतर त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. परंतु आता सुरज खर्च लग्न करतोय की त्याच्या कोणत्या आगामी प्रोजेक्टचा हा भाग आहे असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी त्याने व्हिडीओमधून त्याची होणारो बायको कशी असेल हे चाहत्यांना सांगितले होते. ती रील प्रचंड व्हायरल झाली होती. पण यावेळी सूरजनं शेअर केलेला फोटो मात्र खरा असल्याचं दिसतं आहे. रील स्टार सूरज चव्हाणचं आता अखेर लग्न ठरलं असून त्याच्या बिग बॉसमधील बहिणीनेच ही बातमी कन्फर्म केली आहे.
सूरज चव्हाणला त्याच्या आयुष्यातील जोडीदार कधी भेटणार याकडे सर्वांचं लक्ष होते. अखेर सूरजला त्याची लाइफ पार्टनर भेटली असून लवकरच सुरज आता लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजची बिग बॉसच्या घरातील त्याची बहिण म्हणजे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने स्वतःच ही लग्नाची माहिती शेअर केली आहे. अंकिता नुकतीच सूरज चव्हाणला भेटण्यासाठी त्याच्या घरी म्हणजेच बारामतीला गेली होती. तिथे तिने सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची भेट घेतली. तिच्याबरोबरचा तिने अनेक फोटो देखील शेअर केले आहे. अंकिताच्या कॅप्शनवरून सूरजचं लग्न ठरणार असल्याचे चाहत्यांना कन्फर्म झालं आहे.
अंकिताने इन्स्टाग्रामवर आधी सुरजच्या नव्या घराबाहेरचे फोटो शेअर केले आहेत. तसेच पुढे तिने एक मुलीसोबतही फोटो शेअर केला आहे. अंकिताने तिला मोठी मारली आहे आणि त्या मुलीचा चेहरा लपवून त्यावर हार्ट इमोजी लावला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सूरजला खूप खूप शुभेच्छा! लग्नाला येण शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट.’ या फोटोसोबत अंकिताने बँड बाजा वरात घोडा हे गाणं सुद्धा लावलं आहे. यावरून सूरज चव्हाणचं लग्न ठरलं असून तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं समजलं आहे.
सूरज चव्हाणने काही दिवसांआधी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्याबरोबर एक मुलगी दिसतेय. दोघांनी साऊथ इंडियन लुक केला आहे. पण मुलीने चेहऱ्यावर हात ठेवल्याने तिचा चेहरा दिसत नाही. त्यानंतर सूरज चव्हाणने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातही ती मुलगी पाठमोरी उभी असल्याचं दिसत आहे. त्यानंतर सूरज तिच्या खांद्यावर हात ठेवताना दिसतो आहे.
आता सूरज चव्हाणच्या आयुष्यातील त्याची बच्चा कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान बिग बॉस जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणचं घर बनवण्यासाठी त्याला मदत केली. सूरजचं घर तयार होत असून त्याचं काम पूर्ण होत आलं आहे. लवकरच सूरज चव्हाण नव्या घरात त्याच्या बायकोचं स्वागत करताना दिसणार आहे.
हेही वाचा :
नवरात्रीचा पहिलाच दिवस राशींसाठी भाग्यशाली
नवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजांनाना द्या या भक्तिमय शुभेच्छा
3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस!