रत्नागिरी : सणासुदीपूर्वी केंद्र सरकारने जीएसटी दरकपातीद्वारे (GST rate)सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. २२ सप्टेंबरपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू होणार असून, वाहनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरे तसेच दुग्धजन्य पदार्थ खरेदी स्वस्त होणार आहेत.

वाहनखरेदीत मोठी बचत
दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकीवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे वाहनखरेदीत १० ते १५ हजार रुपयांची थेट बचत होणार आहे. या निर्णयामुळे आधीच अनेक ठिकाणी वाहन बुकिंगसाठी झुंबड उडाली असून, काही ठिकाणी महिनाभराची वेटिंग लिस्ट लागली आहे.
घरखरेदी अधिक परवडणारी
सिमेंटसह बांधकाम साहित्यावरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम खर्च कमी होणार असून, रो-हाऊस आणि अपार्टमेंटची खरेदी सणासुदीत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोडधोड पदार्थासाठी लागणारे दुग्धजन्य साहित्य स्वस्त
बटर, चीज आणि तूपवरील कर १५ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तर पनीरवरील कर शून्य करण्यात आला आहे. परिणामी सणासुदीत गोडधोड बनवणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे होणार आहे.
ग्राहकांसाठी केंद्र सरकारकडून दिलासा
जीएसटी कपातीमुळे वाहनं, घरे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अन्नसाहित्य स्वस्त होत असल्याने यावर्षीच्या दसरा-दिवाळीत खरेदीचा हंगाम जोरात रंगणार आहे(GST rate).
हेही वाचा :
माझा हात रिकामी, काहीतरी काम द्या…; धनंजय मुंडेंची भर सभेत मागणी
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी…..
अखेर सूरज चव्हाणला भेटली त्याची ‘बच्चा’,