आजच्या डिजिटल युगात ग्राहकांना सर्वकाही घरबसल्या, तेही काही मिनिटांत मिळावे, ही मागणी वाढत चालली आहे. या मागणीवर झेप्टो, ब्लिंकीट यांसारख्या डिलीव्हरी(Delivery) कंपन्यांनी “10 मिनिटांत डिलीव्हरी” हा नवा फंडा राबवला. परंतु ग्राहकांचे समाधान आणि बाजारपेठेतील वर्चस्व मिळविण्याच्या या शर्यतीत सर्वात मोठा बळी ठरत आहेत ते म्हणजे या कंपन्यांमध्ये काम करणारे डिलीव्हरी बॉय.

काल अशाच एका दुर्घटनेत तरुण डिलीव्हरी (Delivery)कर्मचाऱ्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना हा अपघात घडला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.डिलीव्हरी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेत जास्तीत जास्त डिलीव्हरी करण्याचा दबाव आणतात. पगाराचे गणितही डिलिव्हरी संख्येवर अवलंबून असते. परिणामी कामगार जीव धोक्यात घालून रस्त्यावर वाहनं चालवतात.
विरुद्ध दिशेने जाणे, वेगाने ओव्हरटेक करणे,वाहतूक नियमांचे उल्लंघन हे प्रकार रोजच्याच झाले आहेत. ग्राहकांना १० मिनिटांत ऑर्डर मिळावी म्हणून डिलीव्हरी बॉय स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर धाव घेतात.तज्ज्ञांच्या मते, “10 मिनिटांत डिलीव्हरी” हे मॉडेल सुरक्षित वाहतूक आणि रस्त्यांवरील वास्तव लक्षात घेता अशक्य आहे.डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांच्याकडे उपलब्ध साधनं अपुरी आहेत.अपघात झाल्यास कंपनी जबाबदारी झटकते.विमा, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षिततेबाबत स्पष्ट धोरण नाही.

ग्राहकांना “सर्वकाही लगेच हवे” या मानसिकतेमुळेच या कंपन्यांना असे मॉडेल राबवण्याचा धाडस मिळाले आहे. ग्राहकांनीही संयम दाखवून डिलिव्हरी कामगारांच्या जीविताचा विचार करणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.रोज वाढणारे अपघात, मृत्यू आणि वाहतुकीची तोडफोड पाहता सरकार आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.डिलीव्हरी कंपन्यांवर कठोर नियम घालावेत. त्याचबरोबर 10 मिनिटांच्या डिलीव्हरीची अट रद्द करण्यात यावी याबाबत मागणी केली जात आहे.
ग्राहकांच्या समाधानाच्या नावाखाली तरुणांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या या व्यावसायिक स्पर्धेवर आता तरी लगाम बसायला हवा. अन्यथा “१० मिनिटांची डिलीव्हरी” ही सुविधा नाही तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा सापळा म्हणून ओळखलं जाईल.ग्राहकांना घरबसल्या झटपट वस्तू पुरविण्याच्या शर्यतीत झेप्टो आणि ब्लिंकीटसारख्या मोठ्या डिलीव्हरी कंपन्यांनी निर्माण केलेल्या दबावामुळे डिलीव्हरी बॉयंचा जीव धोक्यात येऊ लागला आहे. ग्राहकांना केवळ 10 मिनिटांत वस्तू पोहोचविण्याची हमी पाळण्यासाठी या कंपन्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घालून रस्त्यावर वेगाने वाहन चालवत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते.
या तीव्र स्पर्धेत काल आणखी एक बळी गेला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका डिलीव्हरी कर्मचाऱ्याला डंपरने चिरडले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनीही अशा धोकादायक स्पर्धात्मक धोरणांवर संताप व्यक्त केला आहे.डिलीव्हरी कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित त्यांच्या कामगिरीवर म्हणजेच किती डिलिव्हरी पूर्ण केल्या यावर ठेवतात. त्यामुळे कामगार वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, ओव्हरटेक, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा जीवघेण्या पद्धतीने धाव घेतात. परिणामी रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत असून अनेक तरुणांचा जीव धोक्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. मात्र या घटनेनंतर डिलीव्हरी कंपन्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्राहकांना खुश करण्याच्या या शर्यतीत कामगारांचा जीवच धोक्यात घालणारे हे मॉडेल बदलले नाही तर अशा प्रकारच्या दुर्घटना पुढेही घडत राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार…सर्वांसमोरच केली….
AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा
अनैसर्गिक शरीरसंबंध, नवरा चुकीच बोलला, नंतर….