बॉलिवूडचा (Bollywood)बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची “बॅड्स ऑफ बॉलिवूड” ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. १८ सप्टेंबर रोजी प्रीमियर झालेल्या या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.आर्यन खानच्या “बॅड्स ऑफ बॉलीवूड” मधील एक गाण्याने बॉबी देओलशीसंबंधित 28 वर्ष जुनी आठवण ताजी केली आहे.

या वेब सिरीजमध्ये “गुप्त” चित्रपटातील गाणं वापरण्यात आलं आहे, जी आता पुन्हा ट्रेंडिंगमध्ये आहे. “गुप्त” मधील “दुनिया हसीनो का मेला” हे लोकप्रिय गाणं “द बॅड्स ऑफ बॉलिवूड“(Bollywood) मध्ये वापरलं आहे. वेब सीरिजमध्ये बॉबी देओल बॉलीवूड सुपरस्टार अजय तलवारची भूमिका साकारत आहे. यामध्ये त्याच्यासाठीच हे गाणं वापरण्यात आलं आहे. जे अजयवर त्याच्या 90 च्या दशकातील “सैलाब” चित्रपटात चित्रित करण्यात आलं होतं असं दाखवण्यात आलं आहे.

याआधी एका पार्टीत हे गाणं वाजत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण त्यामागाचं कारण शेवटी उलगडतं. जेव्हा अजय आणि मोना सिंगच्या पात्रांचा संबंध जोडला जातो. मोनाला या गाण्यातील एक बॅकग्राऊंड डान्सर दाखवण्यात आलं आहे. एका डान्सरला तिचा चेहरा लावण्यात आला आहे.राजीव राय यांचा “गुप्त” हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला. हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट अनेक कारणांमुळे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. त्यापैकी एक म्हणजे बॉबी देओलवर चित्रित केलेले “दुनिया हसीनो का मेला” हे त्याचे हिट गाणे.

बॉबी देओलने खुलासा केला आहे की, त्याला स्टेप्स योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा रिहर्सल करावे लागत होते. त्याने असंही सांगितलं की, त्या काळात स्टुडिओमध्ये एअर कंडिशनिंग नव्हते आणि दिवसाच्या शेवटी तो घामाने भिजत असे. रिहर्सल दरम्यान घामामुळे त्याच्या डेनिमवर पांढरे डाग पडत असत. गाणे शूट करण्यासाठी त्याने डेनिमच्या आठ ते नऊ जोड्या ठेवल्या होत्या.आता, चित्रपटाच्या रिलीजच्या जवळजवळ तीन दशकांनंतर, “दुनिया हसीनो का मेला” पुन्हा एकदा सर्वांच्या ओठांवर आहे, त्याचे कारण म्हणजे त्याच्या अलिकडच्या रिलीज झालेल्या “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या सीरिजमझ्ये बॉबी देओल एका दमदार भूमिकेत आहे.

हेही वाचा :

अक्षय कुमारचा लग्नाबाबत मोठा खुलासा, ट्विंकलसोबत लवकर लग्न….

जायफळाचे ‘हे’ उपाय केल्यास दूर होईल आर्थिक संकट 

अधिकाऱ्याची महिला डॉक्टरकडे अश्लील मागणी; केबिनमध्ये बोलावलं अन्…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *