सोमवारपासून शारदीय नवरात्र(Navratri) सुरू होणार आहे. नवरात्रीमध्ये अनेकजणांचे कडक उपवास असतात. काही जण एकवेळचा उपवास करतात तर काही जण पूर्ण 9 दिवस उपवास करतात. अशावेळी 9 दिवस उपवासाला काय बनवायचं असा प्रश्न पडतो. कधीकधी साबुदाणा अतिप्रमाणात खाल्ल्याने पचायलाही जड जातो. मग अॅसिडीटी आणि पचनाच्या तक्रारी सुरू होतात. उपवासाची एक सोप्पी व पचायला हलकी असणारी एक रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचा वडा हे पदार्थ नेहमीच उपवासाला केले जातात(Navratri). मात्र आज पचायला हलका आणि पौष्टिक असा एक पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही उपवासाचे भगर थालीपीठ बनवू शकता. हे थालीपीठ कसे बनवायचे यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.

उपवासाचे थालीपीठ
साहित्य

एक वाटी भगर, तूप, बटाटे, जीरे, हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, शेंगदाण्याचा कूट

कृती
सगळ्यात आधी भगर किंवा वरई चांगली धुवून घ्या आणि नंतर त्याचा भात शिजवून घ्यावा. वरई शिजवून घेतल्यामुळं थालीपीठ आतून मऊ आणि वरतून कुरकुरीत लागतात. वरईचा भात शिजवण्यासाठी एका कढईत पाणी,, मीठ आणि तूप घालून त्यात धुतलेला भगर घालून मंद आचेवर वरई मऊसूत शिजवून घ्यावी.

वरईचा भात पूर्णपणे थंड करून घ्या. त्यानंतर आता बटाटे चांगले किसून घ्या. त्यानंतर त्यात जिरे पावडर, हिरवी मिरची, लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.

आता या मिश्रणात थंड झालेला वरईचा भात घाला. त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. जर पीठ जास्त कोरडे वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून चांगले मळून घ्या. आता एक पॅन गरम करुन त्यावर थोडे तेल किंवा तूप लावून घ्या. त्यानंतर या थालीपीठाचा एक गोळा घेऊन पॅनवरच चांगले थापून घ्या.

थालीपीठ थापून झाल्यावर मधोमध एक छिद्र करुन घ्या आणि वरती झाकण ठेवा. थालीपीठाची वरची बाजू सुकल्यानंतर त्याला तेल लावून घ्या आणि परतून घ्या. दोन्ही बाजूने खमंग होईपर्यंत चांगले भाजून घ्या. तुम्ही दह्यासोबत ही थालीपीठ खावू शकता.

हेही वाचा :

Mahindra Bolero खरेदी करायची आहे का?

मागच्या 13 वर्षात ज्या-ज्या वेळी असं झालय,

ब्रेकअपनंतर मलायका आणि अर्जुन कपूर समोरासमोर;

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *