भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप(Asia Cup) 2025 चा सुपर 4 सामना रविवार 21 सप्टेंबर रोजी खेळवला गेला. या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये पाकिस्तानने 5 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 172 धावांचं आव्हान मिळालं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट राखून पूर्ण केलं. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा सलामी फलंदाज साहिबजादा फरहानने त्याच्या बॅटने बंदूक चालवण्यासारखी ऍक्शन केली आणि अर्धशतकाच सेलिब्रेशन केलं. तर वेगवान गोलंदाज हारिस रौफने विमान पाडण्याचा इशारा केला.

हारिस रौफ हा भारताची फलंदाजी सुरु असताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलशी भिडताना दिसला. टीम इंडियाचा पुढील सामना हा बांग्लादेश विरुद्ध होणार असून त्यापूर्वी भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रेयान टेन डोएशेने म्हंटले की, पाकिस्तानी खेळाडूंच्या गैरवर्तनानंतरही, भारतीय खेळाडूंनी संयम राखला. त्यांनी याबाबत अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि तिलक वर्माचे विशेष कौतुक केले.
भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटेने पाकिस्तानचा सलामी फलंदाज साहिबजादा फरहानच्या फायरिंग सेलिब्रेशनवर म्हटले की, ‘त्यांची सुरुवात खूप चांगली होती. मला वाटत नाही की ते यात वाहून गेले. मी म्हणेन की परिस्थिती पाहता, खेळाडू असे का वागत आहेत आणि ते काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत हे तुम्हाला समजू शकते. पाकिस्तानी गोलंदाजांच्या कृती आणि सामन्यादरम्यान बोललेल्या काही शब्दांमुळे भारतीय खेळाडू त्यांचा संयम गमावू शकले असते. पण भारतीय खेळाडूंनी त्यांचे लक्ष पूर्णपणे सामन्यावर केंद्रित ठेवले’.
भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकाने म्हटले की, ‘मी हरिस रौफच्या काही कृती पाहिल्या, पण त्यात आम्ही काळजी करण्यासारखे काही नाही. आम्हाला आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे की त्यांनी या परिस्थितीत स्वतःला सावरलं. आमच्या खेळाडूंनी मैदानावर त्यांच्या बॅटने प्रतिसाद दिला. मला वाटते की इतर संघांना आम्ही केलेल्या काही गोष्टींबद्दल समस्या आहेत, परंतु आमच्यासाठी, या स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी स्वतःला कसे हाताळले याबद्दल आम्ही आनंदी आहोत(Asia Cup)’.
भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि तिलक वर्मा यांचे विशेष कौतुक केले.भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंच्या गैरवर्तनानंतरही संयम राखला आणि त्यांचे लक्ष पूर्णपणे सामन्यावर केंद्रित ठेवले.
सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंनी कोणत्या कृती केल्या? पाकिस्तानचा सलामी फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतकानंतर बॅटने बंदूक चालवण्यासारखे सेलिब्रेशन केले. वेगवान गोलंदाज हारिस रौफने विमान पाडण्याचा इशारा केला आणि भारताच्या अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्याशी भिडताना दिसला.
हेही वाचा :
राजघराण्याची सून झाली असती माधुरी दीक्षित; पण एक गैरसमज अन्…
दीपिका पदूकोण करणार या हॉलीवूड अभिनेत्यासोबत रोमान्स?
नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, ‘त्या’ व्हिडीओमुळे