आशिया कप टुर्नामेंटच्या सुपर 4 राऊंडमध्ये टीम(tournament)इंडियाचा पुढचा सामना बांग्लादेश विरुद्ध आहे. या मॅचमध्ये टीम इंडिया कुठल्या प्लेइंग इलेव्हनसोबत उतरणार हा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराहला आज बसणार का?

भारत आणि बांग्लादेशमध्ये आज 24 सप्टेंबरला सामना होणार आहे. या मॅचमध्ये भारतीय टीम कुठल्या प्लेइंग इलेव्हन सोबत उतरणार? टीममध्ये काय बदल होतील? हा मोठा(tournament) प्रश्न आहे. भारतीय टीमची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? या बद्दल ठोस माहिती नाहीय. पण असं म्हटलं जातय की, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आराम दिला जाऊ शकतो. हे अशासाठी कारण टीम इंडिया 24 सप्टेंबर नंतर 26 सप्टेंबरला सुद्धा मॅच खेळणार आहे.28 सप्टेंबरला फायनल आहे. म्हणजे 6 दिवसात टीम इंडियाला 3 सामने खेळावे लागू शकतात. म्हणून बुमराहला आराम दिला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह पाकिस्तान विरुद्ध महागडा ठरला होता. त्याला एकही विकेट मिळाला नव्हता. अशा स्थितीत त्याला आराम देण्याचा निर्णय योग्य ठरु शकतो.
जर, जसप्रीत बुमराह बांग्लादेश विरुद्ध खेळला नाही, तर त्याच्या जागी अर्शदीप सिंहच खेळणं निश्चित मानलं जातय. अर्शदीप या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत फक्त एक सामना खेळलाय. त्याला ओमान विरुद्ध संधी मिळाली होती. त्यात त्याला यश सुद्धा मिळालं. आता बांग्लादेश विरुद्ध त्याला संधी मिळणार की नाही? ते आज समजेलच. अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीमुळे बांग्लादेशी फलंदाज अडचणीत येऊ शकतात. बांग्लादेश विरुद्ध मागच्या टी 20 सीरीजमध्ये अर्शदीपने 2 सामन्यात 4 विकेट घेतल्या होत्या. बुमराहच्या विश्रांतीशिवाय टीममध्ये क्वचितच काही बदल होऊ शकतात.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंह.
बांग्लादेश विरुद्ध भारताचा रेकॉर्ड काय?
भारताचा बांग्लादेश विरुद्ध कमालीचा रेकॉर्ड आहे. दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत 17 टी 20 सामने झालेत. यात 16 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. बांग्लादेशने फक्त एक मॅच जिंकली आहे आणि हा विजय सुद्धा त्यांना 6 वर्षांपूर्वी 2019 मध्ये मिळाला होता.
पाकिस्तानचा विजय
काल पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात सुपर 4 फेरीतील महत्त्वाचा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. 20 षटकात 8 गडी गमावून 133 धावा केल्या. पाकिस्तानने विजयासाठीच 134 धावांच आव्हान 18 व्या षटकात पाच गडी गमावून पूर्ण केलं.
हेही वाचा :
विमानाची सावली जमिनीवर पडते का?
हिरो डेस्टीनी 110 लाँच, फॅमिलीसाठी नवी स्कुटर बाजारात,
कोण आहे ही लैला जिच्यासाठी अभिषेक शर्मा झाला मजनू,