भारतात पैशाचा व्यवहार करायचं म्हटलं की ऑनलाईन पेमेंट(payments) चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. करोडो युसेर्स आपल्या रोजच्या जीवनात UPI चा वापर करत आहेत. 2 रुपयाचा शाम्पू असो किंवा मग मॉल मध्ये केलेली महिनाभराची खरेदी, UPI हे केवळ भारतातच नाही तर इतही अनेक देशात वापरले जाऊ लागले आहेत. UPI हे एक विश्वासू माध्यम म्हणून नावारूपाला येत आहे, पण तुम्हीही जर सगळ्या व्यवहारत UPI चा वापर करत असाल तर UPI सिस्टिममध्ये केले जाणारे सगळे बदल तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

NPCI ने UPI ॲप्स वर P2P (पियर-टू-पियर) कलेक्ट रिक्वेस्ट सुविधा दिली होती. म्हणजेच कोणत्याही दोन व्यक्ती पारस्परांशी डायरेक्ट डिजिटल व्यवहार करू शकत होते. परंतु आता ही सुविधा 1 ऑक्टोबर पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता फोन पे, गुगल पे अशा ॲप्सवर थेट पैसे मागता येणार नाही.
UPI वर कोणालाही पैसे मागण्यासाठी युसेर्स ॲप द्वारे त्याचा UPI ID टाकून रिक्वेस्ट पाठवली आणि त्या व्यक्तीचे UPI पिन टाकून ती रिक्वेस्ट मान्य केली की लगेच पैसे तुम्हाला पोहोचायचे, पण आता तसं होणार नाही कारण ही सुविधा आता बंद होणार आहे. ही सुविधा केवळ व्यापारी साईटसाठी सुरु राहणार आहे. जसे की फ्लिपकार्ट, अमेझॉन यासारख्या व्यापारी वेबसाईटला फक्त आता याचा लाभ मिळणार आहे. सामान्य युजर्स असे करू शकणार नाही.
UPI ही NPCI नी 2016 मध्ये निर्माण केलेले माध्यम आहे. या माध्यमानातून एकत्रित, स्वस्त आणि सोप्या पद्धत्तीने ऑनलाईन व्यवहार करणे सर्वसामान्यांसाठी सुलभ झाले आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात डिजिटल पेमेंट सोप्या व सुलभ पद्धतीने करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीला आळ बसावा आणि ऑनलाईन फ्रॉड टाळले जावे म्हणून हा निर्णय घेण्यात आळ आहे. पूर्वी देखील या सुविधेअंतर्गत फक्त 2000 रुपये पाठवले जाऊ शकत होते परंतु आता पूर्ण पणे बंद होईल.

ही सुविधा देण्यामागे UPI व्यवहात सुरळीत व्हावा, नातेवाईक, मित्रामैत्रिणीसोबत राहिलेल्या व्यवहाराची आठवण करून देण्यासाठी सुरु झाली होती. परंतु आता सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे(payments).
हेही वाचा :
राजघराण्याची सून झाली असती माधुरी दीक्षित; पण एक गैरसमज अन्…
दीपिका पदूकोण करणार या हॉलीवूड अभिनेत्यासोबत रोमान्स?
नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर ५ महिने सामूहिक बलात्कार, ‘त्या’ व्हिडीओमुळे