शिवयोगाचा संयोगामुळे कुंभ राशीसह या लोकांची भरेल तिजोरी

आज 4 जुलै शुक्रवार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ज्याला भादली नवमी असे म्हणतात.(paksha) शिव आणि मालव्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ.

आज 4 जुलै रोजी शुक्र, चंद्र तूळ राशीमध्ये दिवसभर संक्रमण करणार आहे. आज शुक्रवार असल्याने पूर्ण दिवस शुक्राचे वर्चस्व राहणार आहे. गुरुची शुभ पंचमी दृष्टी चंद्रावर पडेल. यावेळी चित्रा नक्षत्रात शिवयोगाचा उत्तम संयोग तयार होईल. त्यासोबतच मालव्य राजयोगदेखील तयार होत आहे. पंचांगानुसार (paksha)आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ज्याला भादली नवमी असे म्हणतात. ज्यामुळे आज कुंभ राशीसह इतर राशींना याचा फायदा होणार आहे. काहींना कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळू शकतात. तर काहींना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. या लोकांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल.(paksha) जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करत आहे त्यांना लाभ होऊ शकतो. नोकरदार वर्गांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. नातेसंबंधात गोडवा राहील. तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता.

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घेताना विचार करुन काळजीपूर्वक घ्या. क्रीडा, कला, संगीत, नृत्य इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना यश मिळेल. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक फायदेशीर राहील. शेअर बाजारात गुंतवणूक करणे अनुकूल राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. जर तुम्ही मेहनत घेऊन एखादे काम पूर्ण करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या लोकांवर जबाबदाऱ्या असू शकतात. मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप मजबूत असाल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

धनु रास
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस सर्वोत्तम राहणार आहे. व्यवसायामध्ये आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन उंची गाठण्याची शक्यता. कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. तुमचे अडकलेले काम पूर्ण होईल. व्यावसायिकांचे अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायानिमित्त बाहेर जाणे होईल. तुम्ही धार्मिक कार्यात रस घ्याल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. शिक्षणासाठी तुम्हाला दूर जावे लागू शकते.

हेही वाचा :