इंस्टाग्राम रील्सच्या युगात आजकाल बहुतेक लोक फोन हातात (scrolling)घेऊन स्क्रोल करण्यात गुंतलेले असतात. एकामागून एक ३० सेकंदांचे व्हिडिओ पाहण्याची सवय लागल्याने आपल्या मेंदूला सतत बदल पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे वास्तव जीवन अधिक कंटाळवाणे वाटू लागते. पण लक्ष केंद्रित करण्यात अडचण येण्यामागे हे एकमेव कारण नाही.इतरही अनेक कारणे आहेत, जी हळूहळू व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करायला सुरुवात करतात. त्यामुळे लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता का कमी होते आणि ती सुधारण्यासाठी काय करता येईल हे पुढील माहितीतून जाणून घेऊयात.

जेव्हा लक्ष केंद्रित करायला त्रास होतो. तेव्हा हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डरविकार होऊ शकतो. या विकारामुळे लोक गोष्टी विसरायला लागतात. अस्वस्थ राहतात आणि एकाच ठिकाणी बसण्यात अडचण येते. तसेच नैराश्यही लक्ष विचलित होण्यामागचे एक कारण आहे.ही समस्या टाळण्यासाठी काही सोप्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात. उदाहरणार्थ, च्युइंग गम चघळल्याने तात्पुरते लक्ष केंद्रीत राहते, (scrolling) नियमित पाणी पिणे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे आहे आणि दररोज व्यायाम केल्याने मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते.

ध्यान करण्याची सवय लावल्यास विचारांवर नियंत्रण मिळवणे सोपे होते, तर कामाच्या किंवा शिकण्याच्या वेळी स्वतःला सक्रिय ठेवणे, प्रश्न विचारणे किंवा नोट्स लिहिणे हे लक्ष केंद्रीत राहण्यास मदत करते. सततच्या डिजिटल सवयींमुळे कमी झालेली एकाग्रता पुन्हा मिळवण्यासाठी या उपायांचा अवलंब केल्यास मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.नैराश्यामुळे मन उदास, चिडचिडे होते आणि कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही. (scrolling)याशिवाय डोक्याला झालेली दुखापत किंवा डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया आणि डिस्ग्राफिया सारखे विकारही लक्ष केंद्रीत करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात.

हेही वाचा :

आंबेडकरांना भेटल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं असं का म्हटलेलं?

या टोपी खाली दडलय काय या मुकुटाखाली दडलय काय?

लाडक्या वरदविनायक बाप्पाच्या भेटीला भक्तांची मांदियाळी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *