कॉलोन कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा एक गंभीर व जीवघेणा आजार आहे.(cancer) जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये, याचं प्रमाण जास्त दिसून येतं. मांसाहाराचा मोठ्या प्रमाणात समावेश असलेल्या आहार घेणाऱ्या लोकांमध्ये हा कॅन्सर अधिक प्रमाणात आढळतो.

कोरिया, जपान आणि तैवानसारख्या आशियाई देशांतील लोकांच्या मोठ्या आतड्यात पॉलिप्स नावाच्या छोट्या गाठी आढळतात. वेळेत उपचार न केल्यास या गाठी हळूहळू कॅन्सरमध्ये रूपांतरित होतात. ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार असतो, त्यांना इतरांच्या तुलनेत सहा ते दहा पट जास्त प्रमाणात मोठ्या आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. हा आजार आतड्याच्या आतील आवरणावर परिणाम करतो.

मोठ्या आतड्याच्या उजव्या बाजूचा भाग तुलनेने मोठा असल्याने, या भागातील कॅन्सरची लक्षणं लवकर दिसत नाहीत. उलट डाव्या बाजूचा व्यास लहान असल्याने मलावरोध होऊन रोगाचं निदान लवकर होतं.

कुटुंबात आधीपासून कर्करोगाचा इतिहास असल्यास किंवा भाऊ-बहीण यांना हा आजार झाला असल्यास, त्या व्यक्तीला कर्करोगाचा धोका वाढतो. विशेषतः कुटुंबातील पहिल्याच पिढीत एखाद्याला हा आजार झाल्यास,(cancer) इतर सदस्यांसाठी जोखीम अधिक असते.

अयोग्य आहार
प्रक्रिया केलेलं अन्न, कमी फायबर असलेला आहार,(cancer) जास्त चरबीयुक्त पदार्थ आणि असंतुलित आहार यामुळे आतड्याच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

जीवनशैली
व्यायामाचा अभाव, दुपारी जास्त वेळ झोपणं, धूम्रपान, मद्यपान या सवयींमुळेही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

लक्षणं
अन्न न पचणं, अपचन, गॅस आणि पोट फुगणं
शौचावाटे रक्तस्राव
अचानक वजन कमी होणं
थकवा व अशक्तपणा
दीर्घकालीन पोटदुखी
कावीळ होणं

उपचार शस्त्रक्रिया
मोठ्या आतड्याचा आजारी भाग काढून टाकून, उर्वरित मोठं आतडं किंवा छोटं आतडं जोडून दिलं जातं.

केमोथेरपी
कॅन्सरची वाढ थांबवण्यासाठी फॉलफॉक्स पद्धतीची केमोथेरपी दिली जाते. साधारण १५ दिवसांच्या अंतराने १२ मात्रांचा (सहा महिन्यांचा) कोर्स केला जातो.

रेडिएशन थेरपी
क्वचितच गरज भासल्यास ही पद्धत वापरली जाते.

टार्गेटेड थेरपी
यात मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या जातात. या थेट कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करून त्यांचा नाश करतात.

निदान पद्धती कोलोनोस्कोपी
ही सर्वात महत्त्वाची तपासणी असून, यामध्ये डॉक्टर कॅमेऱ्याच्या सहाय्याने आतड्यातील गाठी पाहतात व त्याची बायोप्सी करून कर्करोग आहे का याची खात्री करतात.

बायोप्सी
गाठीचा एक लहानसा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासला जातो.

इतर चाचण्या
सीटी स्कॅन, एक्स-रे, पेट स्कॅन यांच्या मदतीने कर्करोग इतर अवयवांपर्यंत पसरला आहे का हे पाहता येते.

हेही वाचा :

नवीन आयकर विधेयकात काय काय बदललं? ७ नियमांमध्ये झाला मोठा बदल
अंगात 4 भुतं, 11 वेळा संभोग कर, अन्यथा नवरा मरेल अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
उद्यापासून सुरू होतोय फ्लिपकार्टचा Independence Day Sale; खरेदीवर मिळणार 50% पर्यंत बंपर डिस्काउंट

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *