प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं. (shows)मात्र कधीतरी प्रेमात पडल्यानंतर आपल्या विश्वासघात झाल्यासारखं एखाद्या जोडीदाराला वाटतं आणि त्याच्या हातून नको ते घडतं. असाच एक विचित्र प्रकार मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये घडला आहे. संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीवर हल्ला केल्याचा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.हा सारा प्रकार गुरुवारी सायंकाळी इंदूरमधल्या कल्पना नगरमध्ये घडला आहे. येथील एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीला जाणूनबुजून धडक दिली आहे.स्कूटरवरुन आलेल्या एका तरुणीने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला धडक दिली. आपल्या प्रेयसीने आपल्याला सोडून जाऊ नये. आपलं नातं कायम ठेवावं अशी या तरुणाची मागणी होती. मात्र हा नकार तरुणाला पचवता आला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराचा नकार धुडकावून लावत त्याच्या प्रेयसीने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं आणि नात्याला पूर्णविराम दिला.

मात्र असं असतानाही या तरुणाने प्रेयसीला धमकावलं. मात्र तरुणी तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिने नातं पुढे कायम ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे हा तरुण आक्रमक झाला आणि त्याने या तरुणीला धडा शिकवण्याचं ठरवलं.या तरुणाने आपल्या अॅक्टिवाने रस्त्याने चालत असलेल्या आपल्या एक्स गर्लफ्रेंडला धडक दिली. या महिलेने वाटेतून दूर होण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगाने येणाऱ्या दुचाकीचा अंदाज तिला आला नाही आणि तिच्याच एक्स बॉयफ्रेंडने तिला उडवलं. दुचाकीने धडक दिल्यानंतर ही तरुणी काही फुटांवर फेकली गेली. (shows)तिचा आधीचा प्रियकर स्कुटीवरुन फरार झाला. तर स्थानिक लोकांनी येऊन मदत करेपर्यंत जखमी अवस्थेमध्ये ही तरुणी रस्त्याच्याकडेला पडून होती.
आरोपी पर 7 मामले पहले से दर्ज हैं एक लड़की से जबरन प्रेम संबंध बनाने की कोशिश थी, गुरुवार को आरोपी स्कूटर पर आ रहा था लड़की ने खुद को बचाने के लिए उसे पर पत्थर फेंका तो उसने सीधे स्कूटर से उसे टक्कर मार दी मामला इंदौर का है pic.twitter.com/mKvCWYoEa4
— Anurag Dwary September 26, 2025
महिलेवर उपचार करण्यात आल्यानंतर तिने हिरानगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मराहणा, धमकी आणि जाणूनबुजून हानी पोहचवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासामध्ये अशी माहिती समोर आली आहे की आरोपी हा हिस्ट्री शीटर असून यापूर्वी त्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. “आरोपीची ओळख पटवून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी स्पष्ट झाली आहे. (shows)त्याचा शोध सुरु असून लवकरच त्याला अटक करु,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने दिलेल्या महितीनुसार, आरोपी तिच्यावर लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी दबाव टाकत होता. त्याला तरुणीने विरोध केल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि त्यामधूनच वादातून प्रकरण ब्रेकअपपर्यंत पोहोचलं.
हेही वाचा :
वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!
PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी
YouTube वर आले जबरदस्त AI फीचर