तिलाही राहवलं नाही आणि देवीला भेटायला मंदरात (guarding)पोहचली…! देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसून आली सिंहीण, मांडी घातली, शांत बसली आणि एकटक नजरेने फक्त बघतंच बसली.

नवरात्रीचा उत्सव अखेर सुरु झाला असून उत्सवाचा जल्लोष देशभर पसरल्याचे दिसून येत आहे. हा सण दुर्गा मातेला समर्पित असून या काळात तिच्या विविध रुपांची पूजा केली जाते. (guarding)‘नव’ म्हणजे नऊ आणि ‘रात्री’ म्हणजे रात्र, ज्या नऊ उत्साही रात्री दर्शवितात जिथे भक्त दुर्गा देवीच्या विविध अवतारांना आदरांजली वाहतात. सोशल मिडियावर नवरात्रीचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले असतानाच नुकताच इथला एक व्हिडिओ फारच लक्षणीय ठरत आहे. व्हिडिओमध्ये एक सिंहीण शांतपणे देवीच्या मंदिराबाहेर बसलेली दिसते. लोक आता ती देवीच्या मंदिराचं रक्षण करण्यासाठी इथे बसली आहे असा अंदाज लावत आहेत.

काय दिसलं व्हिडिओत?

नवरात्रीच्या काळात सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक सिंहीण मंदिराबाहेर शांतपणे विश्रांती घेत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय वन सेवा अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ शेअर केला आहे. मंदिराबाहेर सिंहिणीची आरामशीर मुद्रा पाहून यूजर्स ती देवीच्या मंदिराचे रक्षण करत असल्याचा दावा करत आहेत. तर काहीजण याला धार्मिक विचाराने जोडणे एक निरर्थक प्रयत्न असल्याचा दावा करत आहेत. हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘किती दिव्य दृश्य आहे. ती सिंहीण मंदिराचे रक्षण करत आहे असे दिसतेय!’. दरम्यान धार्मिक मान्यतेनुसार, सिंह हा देवीचा वाहन मानला जातो.

सिंहीणीचा हा अलाैकीक व्हिडिओ @ParveenKaswan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ५६ हजाराहून अधिकच्या व्युज मिळाल्या असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ सर, हे लोकांसाठी आणि वन्यजीवांसाठी गैरसोयीचे नाहीये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक सुंदर दृश्य” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही जंगलात सगळं बांधलं तेव्हा ती कुठे गेली… हा त्या देशातील सर्वात वाईट काळ आहे जिथे धर्म इतका खोलवर गेला आहे की एक उच्च शिक्षित व्यक्तीही बकवास बोलू लागते….”.

हेही वाचा :

तोंडाला सुटेल पाणी!

‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;

राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *