सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. कंटेट क्रिएशनच्या नावाखाली लोक असे असे स्टंट करतात की पाहून हसून हसून पोट दुखून येईल. कधी कोणी प्राण्यांना गळ्यात घालून, डोक्यावर ठेवून व्हिडिओ बनवले, तर कदी कोणी विचित्रपणे हसून व्हिडिओ बनवले. काहीजण तर विचित्र विचित्र प्रकारचे कपड्यांचे डिझाइन तयार करतात, तर कधी कोणी उपयोग नसलेला जुगाड तयार करतात. तर कधी कोणी कॅमेरा(camera) ऑन कळून पळून जातात. सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यामध्ये एका तरुणीने असे काही केले आहे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी कॅमेरा (camera)ऑन करते. नंतर ती तोंड फुगवून छतावर सुपहिरो असल्यासारखी चढते. त्यानंतर दुसऱ्या घराच्या छतावर स्पायडरमॅनसारखी अक्शन करुन उडी मारते आणि शारुखान सारखी पोझ देते. ती हे सर्व तोंड फुगवून करत असते. हे दृश्य इतके मजेशीर आहे, की पाहून अनेजणांनी याची मज्जा घेतली आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @comedy_girl_143_ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने स्पायडरमॅन दीदी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका ९९+ कॉल्स शारुखानकडून असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने SRK POSE नाही srk pose, तर आणखी एकाने स्पायडरमॅनपण दीदींसमो फिका आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा :
दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…
दोन उंदरांमध्ये सुरु झाले जबरदस्त युद्ध, अनोख्या कुस्तीचा Video Viral
लग्नाच्या वेळी युवराजला वडिलांनी दिलेला विचित्र सल्ला