इचलकरंजी, ता. 13 — श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये ‘एक राखी पत्रकारांसाठी’(Journalists) हा सोहळा उत्साहात पार पडला. समाजमाध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या इचलकरंजी शहरातील सर्व पत्रकार बांधवांना प्रशालेतील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हस्ते तयार केलेल्या राख्या बांधून सन्मानित करण्यात आले.

संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर ,मुख्याध्यापिका ए.एस. काजी,उपप्राचार्य व्ही.जी.पंतोजी, पर्यवेक्षिका व्ही.एस.लोटके, एस. एस. कोळी या सर्वांच्या शुभहस्ते सर्व पत्रकार बांधवांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार(Journalists) रामचंद्र ठिकणे यांनी श्रीमंत गंगामाई शाळेचा इतिहास, पागा इमारतीपासून आजच्या भव्य इमारतीपर्यंत झालेली प्रगती आणि त्या प्रवासात पत्रकार बांधवांचा असलेला सहभाग याची माहिती दिली. तसेच, जिल्ह्यातील नामांकित शाळांमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलचे नाव आदराने घेतले जाते, असेही कौतुक त्यांनी केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण होतो. शैक्षणिक गुणवत्तेसह सामाजिक भान वाढविण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पत्रकार समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असल्याने त्यांचे ऋण व्यक्त करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविकात पर्यवेक्षिका व्ही.एस. लोटके यांनी प्रशालेने पत्रकारांसाठी रक्षाबंधन व एक अनौपचारिक सुसंवाद करण्याचा हेतू विशद केला.आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात मुख्याध्यापिका ए.एस.काजी मॅडम यांनी आजपर्यंत समाजमाध्यम द्वारे योग्य वेळी, योग्य शब्दात प्रशालेच्या विविध उपक्रमांची प्रसिद्धी देणाऱ्या सर्व पत्रकारांच्या सहकार्याबद्दल कौतुक करून शाळा व पत्रकार(Journalists) यांच्यातील सकारात्मक समन्वय विद्यार्थिनीचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतो अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एस.रॉड्रीग्युस यांनी केले यावेळी ज्येष्ठ शिक्षक डी.डी.कोळी ,क्रीडा प्रमुख बी.एस.माने व प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
हेही वाचा :
३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे?
कोकणात जाणाऱ्यांना बाप्पा पावला; मोफत प्रवास, जेवण अन्….
नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले अन्…