गेल्या तीन दिवसांत, जुने हैदराबाद शहर महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका, छत्रपती शिवाजी नगर पालिका प्रशासनाने मांसबंदीचे(meat) आदेश जारी केले आहेत.स्वातंत्र्यदिनी मांस विक्री किंवा कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्रात वाद नव्या वादाची ठिणगी पडली आहे.महानगरपालिकेच्या आदेशानुसार, १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), २० ऑगस्ट (श्री कृष्ण जन्माष्टमी) आणि २७ ऑगस्ट (जैन पर्युषण पर्व, श्री गणेश चतुर्थी आणि जैन संवत्सरी) रोजी सर्व मांस दुकाने, कत्तलखाने आणि संबंधित व्यवसाय संपूर्ण दिवस बंद राहतील.असे आदेश जारी करण्यात आलेत.

१५ ऑगस्ट रोजी काही नगरपालिकांनी चिकन, मटण विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. मालेगाव नगरपालिका, छत्रपती संभाजीनगर नगरपालिका आणि केडीएमसी आयुक्तांनी जिल्ह्यांमध्ये मांसविक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.शिवसेना-उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. “कल्याण डोंबिवली आयुक्तांना निलंबित करावे, व्हेज-नॉनव्हेज हे त्यांचे काम नाही.

आम्ही नवरात्रीतही देवीला नॉनव्हेज देतो. ही कसली परंपरा आहे? लोकांच्या घरात घुसून कोण काय खातयं ते त्यांनी पाहू नये? आयुक्तांनी कामावर लक्ष केंद्रित करावे, त्यांनी कमतरतांवर लक्ष केंद्रित करावे.” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता आम्ही काय खावं आणि काय नाही, ते हे लोकआम्हाला शिकवतील पूर्वी आम्ही गोऱ्यांशी लढायचो, आता आम्हाला चोरांशी लढायचे आहे.”यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही १५ ऑगस्ट रोजी मांसाहारावर बंदी घालणे योग्य नसल्याचे म्हटले होते.

अजित पवार म्हणाले, “मी टीव्हीवर बातम्या पाहिल्या, जेव्हा श्रद्धेचा प्रश्न येतो तेव्हा अशी बंदी घातली जाते. आषाढी एकादशी, महावीर जयंती अशा प्रसंगी हा निर्णय घेतला जातो. आपल्या राज्यात, जर आपण कोकणात गेलो तर प्रत्येक भाजीत सुका मासा (सूकट) टाकली जातो. तसेच, अशी बंदी घालणे योग्य नाही. जर भावनिक समस्या असेल तर त्या वेळेसाठी बंदी घातली तर लोक समजू शकतात. परंतु, महाराष्ट्रात १५ ऑगस्ट रोजी बंदी घालणे योग्य नाही, मी याबद्दल माहिती घेईन, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्रानंतर, तेलंगणामध्ये १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी मांस दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याच्या आदेशावरून वाद वाढला आहे. गेल्या तीन दिवसांत, जुने हैदराबाद शहर महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका, छत्रपती शिवाजी नगर पालिका प्रशासनाने मांसबंदीचे (meat)आदेश जारी केले आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी जुन्या हैदराबाद शहराच्या आदेशाला असंवैधानिक म्हटले. ते म्हणाले की मांस खाण्याचा १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाशी काय संबंध आहे.

महाराष्ट्रातही या निर्णयाविरुद्ध निषेध आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अशा निर्णयाला चुकीचे म्हटले आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘मांस खाण्याचा आणि स्वातंत्र्य दिनाचा काय संबंध आहे? तेलंगणातील ९९ टक्के लोक मांस खातात. ओवेसी यांनी या निर्णयाला लोकांच्या स्वातंत्र्य, गोपनीयता, उपजीविका, संस्कृती, पोषण आणि धर्माच्या अधिकारांचे उल्लंघन म्हटले आहे.’

हेही वाचा :

३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे?

कोकणात जाणाऱ्यांना बाप्पा पावला; मोफत प्रवास, जेवण अन्….

नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले अन्…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *