आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानवर दणदणीत वियज मिळवून(money)भारताने 9व्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरलं. भारताने पाकवर 5 गडी राखून विजय मिळवल्यावर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. पण हा मोठा पराभव पत्करूनही पाकड्यांची काही सुधारण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. आम्ही दहशवाद करत नाही, त्यांना स्थान देत नाही म्हणत रडगाण गाणाऱ्या पाकड्यांचं दहशतवाद्यांबद्दलचं प्रेम आशिया कपच्या फायलननंतर थेट दिसून आलं. खरं तर, 2025 च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताकडून पराभव झाल्यानंतर, पाकिस्तानने एक अशी घोषणा केली ज्यामुळे दहशतवाद्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

हो , हे खरं आहे. सामना गमावल्याच्या निराशेत, पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघा याने हँडशेक कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल पुन्हा रडगाणं तर गायलंच पण दहशतवादाबद्दलचे प्रेमही व्यक्त केले. 2025 च्या आशिया कप फायनल सामन्याची संपूर्ण रक्कम पाकिस्तान दहशतवाद्यांना देणार आहे, खुद्द कर्णधारानेच ती घोषणा केली. त्यामुळे आता दहशतवादी मसूद अझहरही श्रीमंत होईल.फायनलमध्ये भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमानने जाहीर केलं की, पाकिस्तानी संघ आशिया कपच्या अंतिम सामन्याचे शुल्क ऑपरेशन सिंदूरमध्ये बळी पडलेल्यांना देईल. पत्रकार परिषदेत सलमान अली आगाने सांगितलं की, मे महिन्यात पाकिस्तानवर झालेल्या भारतीय हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना त्यांची मॅच फी देतील.

पण सलमानने येथे खूप चातुर्य दाखवले, फक्त बळींच्या कुटुंबियांचा उल्लेख केला, दहशतवाद्यांच्या कुटुंबियांचा उल्लेख केला नाही. पण सत्य हे आहे की पाकिस्तानी टीम अप्रत्यक्षपणे हे पैसे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना देईल. कारण भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यानदहशतवादी तळांवरच हल्ला करण्यात आला होता, अनेक दहशतवादी मारले गेले. कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचे स्वतःचे कुटुंबही त्यात नष्ट झाले.(money)सामन्यानंतर पाक कर्णधार सलमान काय म्हणाला ते जाणून घेऊया. ‘आमचा संघ मे महिन्यात झालेल्या भारतीय हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या आणि मुलांच्या कुटुंबियांना आशिया कपच्या अंतिम सामन्याची फी दान करत आहे.’ असं त्याने जाहीर केलं. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानतंर मे 2025 मध्ये भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता. यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या जैश आणि लष्करच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले.

भारताने जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमध्ये दहशतवादी मसूद अझहरचे कुटुंब नष्ट झाले होते. पाकिस्तानी लष्कराचे अधिकारीही दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. त्यानंतर भारताने स्पष्टपणे सांगितले की ऑपरेशन सिंदूर फक्त पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत होते. (money)त्यामुळे काल पाकचा कर्णधार सलमान याने केलेली देणगीची घोषणा यातून दहशतवाद्यांना दिलेली मदत स्पष्टपणे दिसते. मात्र आता प्रश्न असा आहे की हे पैसे मसूद अझहरच्या कुटुंबाला आणि दहशतवाद्यांना जातील का? तर त्याचं उत्तरही हो अस आहे. पाकिस्तानी संघ पीडितांच्या नावाचा वापर करून अप्रत्यक्षपणे दहशतवाद्यांना देणगी देत ​​आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रविवारी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या थरारक सामन्यात शेवटच्या षटकात पाकिस्तानचाभारताकडून पराभव झाला. (money)भारताने शानदार कामगिरी करत 2025 चा आशिया कप जिंकत 9 व्यांदा स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. मात्र मध्यरात्री झालेल्या सामन्यानंतरचा समारंभ अत्यंत नाट्यमय होता. भारतीय संघाने असीम मुनीर यांचे शिष्य, एसीसी अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी, जे पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत, यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. ते दहशतवाद्यांशी कोणताही व्यवहार करणार नाही. हस्तांदोलन करणार नाही, ट्रॉफी सादरीकरण करणार नाही, असे भारताने स्पष्ट केले. यामुळे प्रेजेंटेशन 90 मिनिटांपेक्षा जास्त उशिरा झाले.

हेही वाचा :

कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी, 

भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *