आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात विविध जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवल्या जातात. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थाना मिळणाऱ्या सुविधा प्रमुख्याने अन्नाच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारी केल्या जातात. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा(Poisoning) झाली आहे. विषबाधेमुळे विद्यार्थ्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. चंद्रपूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात विविध जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवल्या जातात.

आश्रमशाळांमध्ये विद्यार्थाना मिळणाऱ्या सुविधा प्रमुख्याने अन्नाच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारी केल्या जातात. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Poisoning)झाली आहे. विषबाधेमुळे विद्यार्थ्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. चंद्रपूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जांभूळघाट येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 9 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

चिमूर एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत एकूण 538 विद्यार्थी असून 9 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने या विद्यार्थ्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.जेवण केल्यानंतर मुलं-मुलींना रक्ताच्या उलट्या, हातापायांना सूज, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली. आदिवासी संघर्ष समिती सदस्यांनी शाळेत जाऊन विचारपूस केली असता शिळे अन्न दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान, या विद्यार्थ्यांना नेमका कशाचा त्रास झाला, याचा शोध घेतला जात असून त्यांच्या विविध तपासण्या केल्या जात आहेत, अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली आहे.
शाळेचे वर्ग सुरू असताना शाळेच्या दोन इमारतीच्या मधोमध असलेल्या वृक्ष कोसळला आणि त्याची एक फांदी इयत्ता 5 वी च्या खोलीवर कोसळल्याने वर्गातील चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील आयुध निर्माण वसाहतीत घडली. किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर आयुध निर्माणी वसाहतीतील दवाखान्यात उपचार करण्यात आले. केंद्रीय विद्यालयाचे काही वर्ग या वसाहतीतील टाईप 3 सेक्टर 4 या भागातील बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत घेण्यात येत आहे.
या शाळेच्या दोन इमारतीच्या मध्ये एक मोठे झाड होते. आज सकाळपासून जिल्ह्यात पाऊस कोसळत असल्याने हे झाड कोसळले व त्याची एक मोठी फांदी इयत्ता 5 च्या खोलीवर कोसळली. यामुळे सिमेंट ऍसबेसटास टिनाचे शेड तुटून त्याचे तुकडे वर्ग खोलीत खाली पडले. यात चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली. इतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात असल्याने मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा :
वाईन आणि शँपेन काय आहे अंतर, पिण्याऱ्याला देखील नसेल माहिती?
श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य
मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशाचं काय होतं? RBI ने जारी केले नवीन नियम