प्रत्येकाचे बँकेत अकाउंट असते. बँकेत जवळपास सर्वांचेच पैसे असतात.(accounts)परंतु जर एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर त्या बँक अकाउंटचं काय होतं असा प्रश्न अनेकांना आला आहे. बँकेच्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांनी पैसे किंवा लॉकरच्या वस्तूंचा दावा करु शकतात. यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.आता पैसे आणि लॉकरमधील वस्तूंसाठी दावा केला तर बँकेला सर्व कागदपत्र मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत प्रक्रिया करावी लागेल. म्हणजेच हे खातं नॉमनीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायचे असेल बंद करायचे असेल किंवा लॉकरमधील वस्तू कोणाकडे द्यायच्या असतील तर ही प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करावी लागेल. जर उशीर केला तर बँकेला मोठा दंड भरावा लागेल.

रिझर्व्ह बँकेचा हा नियम १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यातयेईल. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना बँकेकडून पैसे मिळवण्यासाठी किंवा लॉकरमधील वस्तू मिळवण्यासाठी खूप वेळा चालणारी प्रक्रिया होती. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. (accounts)परंतु आता आरबीआयने ही प्रोसेस १५ दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बँका आता कोणताही विलंब करु शकणार नाहीत.त्यामुळे खातेधारकांच्या कुटुंबाला फायदा होणार आहे.

जर एफडीमध्ये विलंब झाला तर बँकेला ४ टक्क्याने व्याज द्यावे लागेल. जर लॉकर उघडण्यास बँकेला उशिर झाला तर ज्याचे लॉकर आहे त्याच्या नॉमिनीला दर महिन्याला ५००० रुपये द्यावे लागतील.(accounts)नॉमिनी किंवा जॉइंट अकाउंटधारकांना लॉकरसाठी तत्काळ प्रवेश मिळेल. मात्र, या व्यक्ती नसतील तर कायदेशीर वारसदारांना सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लॉकरमधील वस्तू मिळणार आहेत.

हेही वाचा :

आंबेडकरांना भेटल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं असं का म्हटलेलं?

या टोपी खाली दडलय काय या मुकुटाखाली दडलय काय?

लाडक्या वरदविनायक बाप्पाच्या भेटीला भक्तांची मांदियाळी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *