तुमचेही स्वप्न परदेशात फिरायला जाण्याचे असेल पण (dream)बजेटमुळे तुमचे प्लॅन रद्द करावे लागले असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखात आपण जगभरातील काही बजेट-फ्रेंडली देशांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत भेट देता येते.

आपल्यापैकी अनेकांना फिरायला जाण्याची एखादे ठिकाणं एक्सप्लोर करायची खूप आवड असते. प्रवास म्हटंल की आयुष्यात एकदा तरी परदेशात जावेसे वाटते. कारण प्रवास (dream)केल्याने तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आणि पाहण्याची संधी मिळते, ज्याचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर देखील होतो.
थायलंडला फिरायला जाण्याचा करा प्लॅन
थायलंड हे एक सुंदर देश आहे. त्यात थायलंडला भेट देण्याची क्रेझ लक्षणीयरीत्या वाढली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हा देश एकदम बजेट-फ्रेंडली आहे. येथील नाईटलाइफ, मंदिरे आणि स्ट्रीट फूडपासून ते सर्व काही एक अनोखा अनुभव देते. तुम्ही थायलंडमधील पटाया, फुकेत आणि बँकॉक सारख्या ठिकाणी भेट देऊ शकता. तीन दिवसांचा प्रवास 1 लाखापेक्षा कमी किमतीत करता येतो. दिल्लीहून विमान तिकिटाची किंमत सुमारे 18,000 ते 22,000 असेल. तुम्ही थायलंडमध्ये 3-स्टार हॉटेल किंवा हॉस्टेलमध्ये राहू शकता, ज्याची किंमत 3,000 रूपये पर्यंत असू शकते. तर थायलंड मधील स्ट्रीट फूड देखील परवडणारे आहे. मात्र बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला तुमची फ्लाइट आणि हॉटेल ट्रिपला जाण्याआधीच बुक करावे लागेल.
व्हिएतनाम देखील एक चांगला पर्याय आहे
व्हिएतनाम त्याच्या प्राचीन मंदिरांसाठी, हाँग बे आणि हो ती मिन्ह सिटीसाठी ओळखले जाते. तुम्हाला या देशाची संस्कृती आवडेल. येथे पाहण्यासारखे बरेच काही आहे. व्हिएतनामचे समुद्रकिनारे खूप लोकप्रिय आहेत, ज्यात माय खे बीच, फु क्वोक आणि न्हा ट्रांग यांचा समावेश आहे. येथे तुम्हाला वाघ आणि आशियाई हत्तीसारखे दुर्मिळ प्राणी देखील पाहायला मिळतील. हा देश खूपच बजेट फ्रेंडली आहे. दिल्ली ते व्हिएतनामचा राउंड ट्रिप 16,000ते 40,000 रुपयांपर्यंत असू शकतो. दररोज जेवण आणि प्रवास अंदाजे 4,000 रुपयांमध्ये पूर्ण करता येतो. राहण्यासाठी अनेक परवडणारी हॉटेल्स आणि वसतिगृहे उपलब्ध आहेत.
मलेशिया देखील बजेट फ्रेंडली आहे
मलेशिया हा देश त्यांच्या बहुसांस्कृतिक वारसा आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो. येथे तुम्हाला मलय, चिनी, भारतीय आणि स्थानिक संस्कृतींचे मिश्रण बघायला मिळेल. तर मलेशियाला जाण्यासाठी विमान तिकिटे 20,000ते 25,000 रुपयांना मिळू शकतात. राहण्यासाठी 2,000-2500 रुपये आणि खाण्यापिण्यासाठी रोजचे 1,000 रुपये खर्च येईल. स्थानिक वाहतुकीने प्रवास करून तुम्ही आणखी पैसे वाचवू शकता.
श्रीलंकेचे सौंदर्य एक्सप्लोर करा
श्रीलंका हा भारताचा शेजारी देश आहे. तुम्ही येथे बजेटमध्ये प्रवास करू शकता. श्रीलंकेत पाहण्यासाठी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. जेवण, राहण्याची व्यवस्था आणि पर्यटन स्थळे पाहणे हे सर्व तुमच्या बजेटमध्ये असेल. श्रीलंकेला जाण्यासाठी राउंड-ट्रिप तिकिटाची किंमत 15,000 ते 20,000 रुपये आहे. राहण्यासाठी हॉटेल्स रूम 2,000 ते 2500 रुपयांना मिळू शकतात आणि 20,000 ते 25,000 रूपयांत प्रेक्षणीय स्थळे पाहाता येतील. येथे ऐतिहासिक मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव सफारी आणि बरेच काही पाहण्यासारखे आहे.
कमी बजेटमध्ये प्रवास करण्यासाठी स्मार्ट टिप्स
आगाऊ बुकिंग: कुठेही जाण्यापूर्वी तुमची फ्लाइट आणि हॉटेल 2-3 महिने आधीच बुक करा.
ऑफ-सीझन निवडा: ऑफ-सीझनमध्ये तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करा. कारण यामुळे तुम्हाला निम्म्या किमतीत फ्लाइट आणि हॉटेल्स मिळण्यास मदत होऊ शकते.
हॉस्टेलमध्ये राहा: हॉटेलऐवजी हॉस्टेलमध्ये राहा. ते सहसा स्वस्त असतात..
स्थानिक वाहतुकीचा वापर करा: जर तुम्ही कोणत्याही देशात गेलात तर खाजगी टॅक्सीऐवजी स्थानिक वाहतुकीने प्रवास करा.
प्रवास विमा: प्रवास विमा घेतल्याने तुमचा प्रवास सुरक्षित होईल.
हेही वाचा :
तमन्ना एवढी फिट आणि सुंदर कशी,
नेपाळकडून विंडीजचा सलग दुसऱ्या सामन्यात धुव्वा,
7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत ‘हे’ 32 इंचाचे स्मार्ट टीव्ही,