देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.(fasting) या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि उपवास केले जातात. उपवास दरम्यान भक्त सात्विक पदार्थांचे सेवन करत असतात. ज्यामध्ये बटाटे, शिगांडयाचे पीठ आणि साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ जसे की साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर आणि बरेचकाही पदार्थ सेवन केले जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की उपवास दरम्यान तुम्ही खात असलेला साबुदाणा खरा आहे का?

खरं तर, उपवासाच्या दिवसांमध्ये बाजारात साबुदाण्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढते. यामुळे साबुदाण्यात भेसळ होते. बनावट साबुदाण्याची चव खराबच असते तर आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या लेखात आपण बनावट साबुदाणा ओळखण्याचे काही सोपे ट्रिक्स जाणून घेऊयात.
साबुदाणा उकळून तपासा
बनावट साबुदाणा ओळखण्यासाठी तुम्ही खरेदी केलेले थोडेसे साबुदाणे पाण्यात उकळून तपासावा लागेल. हे करण्यासाठी एका भांड्यात पाणी भरा आणि त्यात साबुदाणा टाका, (fasting) जर साबुदाणा उकळल्यानंतर खूप चिकट झाला तर तो बनावट आहे. कारण खरा साबुदाणा पाण्यात बुडवल्यानंतरही वेगळा राहतो आणि कमी चिकट होतो.
तुम्ही रंगावरून देखील ओळखू शकता
आजकाल बाजारात मिळणारे पदार्थ ताजे आणि शुद्ध दिसण्यासाठी चमकदार बनवले जातात. भेसळयुक्त साबुदाणाही अशाच पद्धतीने चमकदार बनवला जातो. चांगला भेसळ नसलेला साबुदाणा हा ऑफ व्हाइट रंगाचा असतो आणि पारदर्शक असतो. अशातच तुम्ही खरेदी केलेला साबुदाणा पूर्णपणे पांढरा आणि चमकदार असेल तर तो बनावट किंवा भेसळयुक्त असू शकतात.
स्पर्श करून तपासा
तुम्ही खऱ्या आणि बनावट साबुदाण्याला स्पर्श करूनही फरक ओळखू शकता. (fasting) हे करण्यासाठी साबुदाणा तुमच्या तळहातावर ठेवा आणि तो घासून घ्या. जर साबुदाण्यातून खूप पांढरी पावडर निघत असेल तर ती भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. कारण खऱ्या साबुदाण्यापासून पावडर लवकर निघत नाही.
पाण्यात टाकून चाचणी करा
तुम्ही साबुदाणा पाण्यात टाकून बनावट आहे का नाही हे देखील तपासू शकता.(fasting) साबुदाणा सामान्य पाण्यात ठेवा आणि थोडा वेळ तसेच ठेवा. जर साबुदाणा पाण्यात तरंगत असेल तर तो बनावट असू शकतो. खरा साबुदाणा पाण्यात तरंगत नाही तर भांड्याच्या तळाशी राहतो.

बर्न टेस्ट
खरा साबुदाणा ओळखण्यासाठी बर्न टेस्ट देखील उपयुक्त ठरू शकते. (fasting) हे करण्यासाठी तुम्हाला एक साबुदाणा घेऊन तो आगीवर जाळावा लागेल. जर साबुदाणा जाळल्यावर प्लास्टिकसारखा वास येत असेल तर तो बनावट असू शकतो. खरा साबुदाणा जाळल्यावर प्लास्टिकसारखा वास येत नाही.
हेही वाचा :
तोंडाला सुटेल पाणी!
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,