बॉलिवूडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. (arrested)‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटासह अन्य काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली चेन्नई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.चेन्नई कस्टम्स आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या संयुक्त कारवाईत, या अभिनेत्याकडून तब्बल ३.५ किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये असल्याची माहिती आहे.

एअर इंटेलिजेंस युनिटला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रविवारी सकाळी या अभिनेत्याला विमानतळावर थांबवण्यात आले. त्याच्या चेक-इन केलेल्या सामानाच्या ट्रॉलीमध्ये एका बनावट कंटेनरमध्ये प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये लपवलेली पांढरी पावडर आढळून आली.तपासणीनंतर ती पावडर कोकेन असल्याचे सिद्ध झाले. (arrested)‘चौकशीदरम्यान, आपण कंबोडियाहून सिंगापूरमार्गे चेन्नईत पोहोचल्याचे सांगितले. ही ट्रॉली त्याला अज्ञात व्यक्तींनी दिली होती आणि विमानतळावर ती दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवायची होती.

सध्या DRI या संपूर्ण ड्रग्ज नेटवर्कची कसून चौकशी करत आहे. ही खेप मुंबई किंवा दिल्लीतील मोठ्या ड्रग्ज नेटवर्कला पोहोचवण्यासाठी आणली होती, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे. (arrested)‘या अभिनेत्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही, मात्र तो यापूर्वीही ड्रग्ज तस्करीत सामील होता का, यासाठी कस्टम टीम त्याच्या मागील प्रवासाच्या नोंदी तपासत आहे.
हेही वाचा :
तोंडाला सुटेल पाणी!
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,